एक्स्प्लोर

31 March Headlines : आयपीएलच्या थराराला सुरुवात, अनिल जयसिंघानी यांच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवसभरात

आरएसएसची तुलना तालीबानशी केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात एक गुन्हा नोंद करण्यात आली आहे. त्यासंबंधित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 

31 March Headlines : आजपासून आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. त्याचसोबत आज अनिल जयसिंघानी, जावेद अख्तर, चंदा कोचर, श्रद्धा वालकर यांच्यासंबंधित याचिकांवर सुनावणी होणार आहे. याचसोबत आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,

अनिल जयसिंघानी यांच्या अटकेच्या याचिकेवर सुनावणी

अमृता फडणवीस प्रकरणात अटक आरोपी अनिल जयसिंघानीनं अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. आपल्या विरोधात दाखल FIR दाखल करण्यापासून अटक करेपर्यंत पोलिसांनी कायदेशीर बाबींच उल्लंघन केल्याचा दावा अजय जयसिंघानी यांनी या अर्जात केला आहे. 

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर सुनावणी 

आरएसएसची तुलना तालीबानशी करणाऱ्या गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावरील वादावर मुलुंड कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयानं जावेद अख्तर यांना याप्रकरणी दिलासा द्यायला नकार दिल्यानं, आज जावेद अख्तर कोर्टात हजर होतात का हे पाहणं महत्वाचं आहे. 

आयपीएलचा हंगाम सुरू 

आजपासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरूवात होणार आहे. गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

कलिना लायब्ररी लाच प्रकरणी याचिकेवर सुनावणी

पीएमएलए कोर्टात कलिना लायब्ररी कामात लाच घेतल्याचा आरोपांच प्रकरण न्यायालयात असून त्यावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळांवर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. नाशिक फेस्टिवलसाठी  ही लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भुजबळांसह इतरांनी ही केस डिस्चार्ज करण्यासाठी एक याचिका दाखल केली आह.

चंदा कोचर यांच्या विरोधातील सीबीआयच्या रिमांड अॅप्लिकेशनवर सुनावणी 

सीबीआय कोर्टात चंदा कोचर विरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या रिमांड अप्लिकेशनवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टानं जर सीबीआयची विनंती मान्य केली तर चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी

श्रद्धा वालकर प्रकरणात आज साकेत कोर्टात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आफताबला ताकिद दिली होती कि पुन्हा वकिल बदलला तर बाजू मांडायला वेळ दिला जाणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget