चॉकलेटचं आमिष दाखवून 3 चिमुकल्यांवर अत्याचार; बदलापूर घटनेची जखम ताजी असतानाच अकोल्यात पुनरावृत्ती
Akola Crime : राज्यभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच अकोला जिल्ह्यातल्या पातुर शहरात चॉकलेट आणि बिस्कीटचं आमिष दाखवून 3 लहान मुलांची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय.
Akola Crime News अकोला : राज्यभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. यात अकोला जिल्ह्यातल्या पातुर शहरात चॉकलेट आणि बिस्कीटचं आमिष दाखवून 3 लहान मुलांची छेड (Sexual Abuse) काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पातूरात तीन अल्पवयीन मुलांना एक व्यक्ती सतत चॉकलेटचं आमिष दाखवत सोबत नेण्याचा प्रयत्न करीत होता.
दरम्यान,एक दिवस तिन्ही मुलं सोबत जाण्यास नकार देत असल्याने या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून मुलांनी शाळेत जाणं टाळलं होतं. त्यामुळे नातेवाईकांनी मुलांना विचारणा केली असता, मागील महिनाभरापासून एक व्यक्ती सतत त्रास देत असल्याचं (Crime News) त्यांनी सांगितलं आणि पुढे हा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पातुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती अकोल्यात तर नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी चॉकलेटच आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणात पातुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत आरोपीवर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलेय. मुलांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे. घटनेतील आरोपी पातूरमध्येच एका शासकीय नोकरीवर असल्याची माहिती समोर आलीये. मात्र या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
10 वर्षीय मुलीवर अत्याचार
नुकतीच अशीच एक घटना अकोल्यात घडली झाली होती. यात जन्मदात्या पित्याने 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेले असताना याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोटफैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
सुरुवातीला वडिलांकडून पुढं मामानेही केलं लैंगिक शोषण
दुसरीच्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. पीडित मुलीच्या या तक्रारीनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अत्याचार करणारा दूरचा नातेवाईक आणि वडील हे दोघेही अटकेत आहेत. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि नात्यातील मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.
हे ही वाचा