एक्स्प्लोर

नामवंत महाविद्यालयात शिक्षकांनी केला 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच दोन्ही शिक्षक फरार

Chandrapur Crime News : बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना चंद्रपूरच्या (Crime News) वरोरा येथील एका नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे

Chandrapur Crime News :  बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना चंद्रपूरच्या (Crime News) वरोरा येथील एका नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात दोन शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. 17 वर्षीय विद्यार्थिनी बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत असून वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावून अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे.

पीडित मुलीने या प्रकरणाची माहिती पालकांना दिल्यावर वरोरा पोलिसांनी पोक्सो (POCSO) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच संशयित दोन्ही आरोपी शिक्षक फरार झाले आहे. मात्र, या घटनेची माहिती मिळताच वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

10 वर्षीय मुलीवर अत्याचार

अशीच एक घटना अकोल्यात घडली असून यात  जन्मदात्या पित्याने 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.  

अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार (Akola Crime News) झाल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेले असताना याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोटफैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

सुरुवातीला वडिलांकडून पुढं मामानेही केलं लैंगिक शोषण

दुसरीच्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. पीडित मुलीच्या या तक्रारीनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अत्याचार करणारा दूरचा नातेवाईक आणि वडील हे दोघेही अटकेत आहेत. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि नात्यातील मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

अल्पवयीन मुलींवर अत्याचार 

सिंदखेडराजा तालुक्यातील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी शिक्षकाला मेहकर सत्र न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 23 ऑगस्ट रोजी तालुक्यातील एका शाळेत चौथ्या वर्गातील मुलींवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याच दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पोलिसांनी तत्काळ संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो, अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत अटक केली होती.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Horoscope Today 22 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: : 22 डिसेंबर 2024 : ABP MajhaDharashiv PavanChakki Case | पवनचक्की मारहाण प्रकरण; 3 महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटूंब आंदोलनालाABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 22 December 2024Sharad Pawar Tafa Car Accident | केजमध्ये शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Injury : मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
मेलबर्न कसोटीतून रोहित शर्मा बाहेर? नेटमध्ये सराव करताना गंभीर दुखापत; टीम इंडियाला मोठा धक्का
Horoscope Today 22 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
Embed widget