(Source: ECI/ABP News/ABP Majha)
20 December Headlines : ग्रामपंचायत निवडणूक निकाल, विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस, आज दिवसभरात
20 December Headlines : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
20 December Headlines : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे.
Winter Assembly Session : विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस
महाविकास आघाडीची सकाळी 9 वाजता अजित पवारांच्या निवास्थानी बैठक होणार आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करणार आहेत.
वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
राज्यातील दहा वारकरी संघटना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्यासोबतच महापुरूषांवरील अक्षेपार्ह वक्तव्याबाबत ही भेट असणार आहे.
नागपुरातील रामटेक येथे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आवारात आज माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
मनसेची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.
भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी प्रदर्शित केली जाणार
भारतात 13 जानेवारी पासून सुरु होत असलेल्या हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी आज भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर प्रदर्शित केली जाणार आहे. 13 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान ओडिसातील कलिंगा, भुवनेश्वर आणि राहुरकेला येथे हॉकी विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.
ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेवर सुनावणी
भाजप नेते चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राम कदम यांच्यासह मुंबई पोलिस आयुक्तांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंकडून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.