एक्स्प्लोर

मुंबई महानगर प्राधिकरणाच्या हद्दीत वाढ होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 निर्णय

या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढवणे, सैन्य दलातील शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना अनुदान, अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ, यांसह 16 निर्णय घेण्यात आले आहे.

मुंबई : राज्य मंत्रीमंडळातील बैठकीत आज एकूण 16 निर्णय घेण्यात आले आहे. आतापर्यंत मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वात जास्त निर्णय आज घेण्यात आले आहे. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढवणे, सैन्य दलातील शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना अनुदान, अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ, यांसह 16 निर्णय घेण्यात आले आहे. आजच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय 1. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता. 2. महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्य दलातील शौर्यपदक व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वोच्च पदकांना अनुदान देण्यात येणार. 3. अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्यास मंजुरी. 4. रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी मध्यम प्रकल्पाच्या 950 कोटी 37 लाख किमतीस चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता. 5. व्यक्ती, संस्था आणि कंपनी यांना विविध प्रयोजनार्थ कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकिय जमिनीवरील इमारत बांधकामास मुदतवाढीसाठी नवीन धोरण. 6. एमपीएससीने घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित पदोन्नती परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये गुणवत्ताधारक पात्र खुल्या प्रवर्गातील 982 उमेदवारांचा समावेश करण्यास मान्यता. 7. पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांचे शासनाकडील अपील मान्य करण्याचा निर्णय. 8. विक्रीकर विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रचलित अधिनियमांतर्गत असणाऱ्या थकबाकीच्या तडजोडीसाठीचे विधेयक सादर करण्यास मान्यता. 9. महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम-2002 व महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार आजिविका व नोकऱ्यांवरील कर अधिनिय-1975 मधील सुधारणेसाठी विधेयक मांडण्यास मान्यता. 10. मुंबई विद्यापीठात प्रो. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडिज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट हे केंद्र सुरू करण्यास मान्यता. 11. सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबई या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाची स्थापना करण्यास मान्यता. 12. पुणे जिल्ह्यातील अंबी (तळेगाव) येथे डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस मान्यता 13. धुळे जिल्ह्यातील रावलगाव दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील सहकार महर्षी दादासाहेब रावल सहकारी सूतगिरणीची शासन अर्थसहाय्यासाठी निवड. 14. नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या 1124 कामगारांना 10 कोटी सानुग्रह अनुदान देण्यास मान्यता. 15. मृद व जलसंधारण विभागांतर्गत नागपूर येथे मुख्य अभियंता तथा अपर आयुक्त जलसंधारण (लघु सिंचन) या कार्यालयाच्या निर्मितीसह राज्यातील जलसंधारण यंत्रणेमध्ये सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय. 16. तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या सर्व शासन व शासन अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ग्रंथपालांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मान्यता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaharashtra : तिजोरीत खडखडाट,कंत्राटदार चिंताक्रांत! कंत्राटदार महासंघ काय म्हणतो?Ajit Pawar : मविआत जाण्याचा इशारा देणाऱ्या चिंचवडच्या समर्थकांशी अजित पवारांसोबत बैठकSanjay kaka Patil On Sangli Rada : विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
Video : फडणवीसांची रावडीस्टाईल... ''देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है''
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
झिरवळांचा राज ठाकरेंवर पलटलवार; धनगड दाखल्यावरुन मुख्यमंत्र्यांनाही जाब विचारणार
Embed widget