एक्स्प्लोर
नगरमधील विखे पाटील संकुलात 150 फूट उंच ध्वज
ध्वजाची लांबी 45 फूट आणि रुंदी 30 फूट आहे. एक किलोमीटरच्या परिसरातून ध्वज दृष्टीक्षेपात येतो.
अहदमनगर : अहमदनगरला विळद घाटात विखे पाटील शैक्षणिक संकुलात 150 फूट उंचीचा ध्वज उभारण्यात आला आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
समुद्र सपाटीपासून तब्बल 6 हजार 979 फूट उंचीवर ध्वज असल्याचं विश्वस्त डॉक्टर सुजय विखे यांनी सांगितलं. ध्वजाची लांबी 45 फूट आणि रुंदी 30 फूट आहे. एक किलोमीटरच्या परिसरातून ध्वज दृष्टीक्षेपात येतो.
इलेक्ट्रॉनिक मशीनच्या मदतीनं तिरंगा चढवण्यात आला आहे. दिवसरात्र हा ध्वज फडकत राहणार असून रात्रीच्या वेळी प्रकाशझोत सोडण्यात येणार आहे.
विश्वस्त सुजय विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तर पुढील स्वातंत्र्यदिनाला देशातील सर्वात मोठा ध्वज उभारण्याचा मानस सुजय विखेंनी व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement