एक्स्प्लोर
Advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी 12 जणांना अटक
कोरेगाव-भीमा इथं 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तब्बल आठवडाभरानं पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरेगाव-भीमा, (पुणे) : कोरेगाव-भीमा इथं 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तब्बल आठवडाभरानं पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन जण अल्पवयीन आहेत.
हे सर्व बारा आरोपी कोरेगाव-भीमा, सणसवाडी आणि कोंढापुरी या तीन गावांमधील आहेत. दोन्ही गटातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यानं या बाराही आरोपींची नावं पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. अटक केलेल्या आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरुन करण्यात आला, किंवा यामागे नेमकं कोण होतं? या सर्व गोष्टींची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
दरम्यान, आठवड्याभरानंतर 12 जणांना अटक करण्यात आलेली असली तरीही पोलिसांचा याप्रकरणी अजूनही या भागात तपास सुरुच आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम करत असून जे दोषी आढळतील त्यांना अटक करण्यात येणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला होता. या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता.
संबंधित बातम्या :
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने इतिहासाची मोडतोड केली : भिडे गुरुजी
‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया
देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे
भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement