एक्स्प्लोर

मुंबईत अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदत वाढवली!

मुंबई : मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची मुदत शिक्षण विभागाने वाढवली आहे. आता 29 जूनच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जात मुंबईत तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेवेळी त्रास झाला. मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत शिक्षण विभाकडून वाढवण्यात आली आहे. आधी 27 जूनपर्यंत (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र, ती आता 29 जूनपर्यंत (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) अकरावीचे विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरु शकतील. http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन टप्प्यात ही अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे. गुणवत्ता यादीसाठी भाग एक आणि भाग दोन मंजुरीसह पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर ‘माय स्टेटस’ तपासून पाहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक! ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा – 16 ते 27 जून (मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी 29 जूनपर्यंत) सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख – 30 जून, संध्याकाळी 5 वाजता अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख – 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता * पहिली यादी पहिली गुणवत्ता यादी – 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत * दुसरी यादी दुसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी – 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता * तिसरी यादी तिसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख – 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता तिसरी गुणवत्ता यादी – 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता * चौथी यादी – चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत – चौथी गुणवत्ता यादी – 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता – फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता यंदा मुंबईतील पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. तर 10 हजार 157 विद्यार्थ्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यातही 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी यंदाच्या नामांकित कॉलेजची सायन्सची कटऑफ 93 टक्क्यांपर्यंत बंद होण्याचा अंदाज आहे. अकरावी प्रवेशाबाबत ए टू झेड माहिती अकरावीच्या उपलब्ध जागा – अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा – 1 लाख 32 हजार 408 – ऑनलाईन प्रवेश – 1 लाख 59 हजार 682 – एकूण जागा – 2 लाख 92 हजार 90 2016 मधील कट ऑफ कला : जास्तीत जास्त 94.4% ते कमीत कमी 80% वाणिज्य : जास्तीत जास्त 94.5 % ते कमीत कमी 89.8% विज्ञान : जास्तीत जास्त 93.2 % ते कमीत कमी 91%
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut Full Majha Vision 2024 : बाळासाहेब असते तर त्यांनी देशात मोदी विरोधात रान उठवलं असतंBachchu Kadu Tondi Pariksha : एका अटीवर शिंदेसह गुवाहाटीत गेलो! बच्चू कडूंचा सर्वात मोठा खुलासाUddhav Thackeray on PM Modi  : मुख्यमंत्री किती कोटींचा? उद्धव ठाकरे यांचा मोदींना थेट सवालABP Majha Headlines : 11 PM : 15 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
राजस्थानचा सलग चौथा पराभव, पंजाबने 5 विकेटनं लोळवलं, सॅम करनचे अर्धशतक
Mumbai University : मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते,  लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
तरुणांमध्ये हायपोथायरॉईड का वाढतोय, कारणं कोणती ? जाणून घ्या सविस्तर
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
आशियाई तायक्वांदो स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये रौप्यपदक
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
पंजाबच्या माऱ्यासमोर रजवाडे ढेर, रियानची एकाकी झुंज, राजस्थानची 144 धावांपर्यंत मजल
Embed widget