एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

फेसबूक फ्रेंडशिप नागपुरातील वृद्धाला महागात पडली, लंंडनमधील कथित मैत्रिणीचा 10 लाखांना गंडा

मैत्रिणीच्या आकर्षणात पुरते अडकलेले वृद्ध या जाळ्यात अडकले आणि त्यांनी 9 लाख 66 हजार रुपए लिडाने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवले.

नागपूर : लंडनच्या एक कथित मैत्रिणीने नागपूरातील एका 66 वर्षीय वृद्ध व्यक्तीला लाखोंचा गंडा घातला आहे. कस्टम ड्युटीच्या नावाखाली सेवानिवृत्त वृद्धाचे 10 लाख रुपये या मैत्रिण आणि तिच्या टोळीने लंपास केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

नागपूरमधील 66 वर्षांच्या वृद्धाची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर लिडा थॉमसन नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. आधी चॅटिंग नंतर फोनवर सतत बोलणे होऊ लागले. लिडाने तिचे लंडनमधील अनेक नामांकित ठिकाणांवरचे फोटो दाखवून नागपुरातील या वृद्ध व्यक्तीला भुरळ घातली. लॉकडाऊनच्या काळात अचानक एक दिवशी लिडाने ती भारतात येऊ इच्छिते आणि तिच्याकडील कोट्यवधी रुपयांनी भारतात सेवा कार्य करू इच्छिते असं सांगितले. नागपुरातील या वृद्ध मित्रानेही तिला होकार दिला.

अचानक एकेदिवशी लिडाचा पुन्हा फोन आला आणि ती दिल्ली एयरपोर्टवर अडकली असून तिला कस्टम अधिकाऱ्यांनी थांबवल्याची थाप मारली. तिच्याकडे भारतात सेवा कार्यासाठी आणलेले 2 कोटी रुपये असल्याने तिला कस्टमवाले 10 लाख कस्टम ड्युटी भरल्याशिवाय बाहेर निघू देत नाही आहे, असं लिडाने सांगितले. सोबतच फोनवरून बनावट एयरलाईनचे अधिकारी आणि बनावट कस्टम अधिकारी यांच्याशी बोलणे करून दिले. आपल्या मैत्रिणीच्या आकर्षणात पुरते अडकलेले वृद्ध या जाळ्यात अडकले आणि त्यांनी 9 लाख 66 हजार रुपए लिडाने सांगितलेल्या बँक खात्यात पाठवले. त्यांनतर लिडा बेपत्ता झाली आणि एयरलाईन व कस्टम अधिकारीही बेपत्ता झाले.

अनेक आठवडे लिडाची वाट पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध व्यक्तीने काल बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी लिडा आणि सहकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, आतापर्यंतच्या तपासात वृद्धासोबत बोलणारी महिला कधीच लंडनमधून बोलत नव्हती तर ती दिल्लीतूनच बोलत होती, असं समोर आले आहे. वृद्ध, सेवानिवृत्त, महिला, विद्यार्थी असे घटक या भामट्यांचे टार्गेट असतात, त्यामुळे त्यांनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचे पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | महायुती 121, महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता ABP MajhaNitesh Karale Master : भर रस्त्यात मारहाण,मुलीलाही लागल; कराळे मास्तरांनी सांगितलं पूर्ण कहाणीSonali Kulkarni on Election : यंदाची निवडणूक संभ्रमित करणारी, सोनाली कुलकर्णींनी दिला सल्लाMaharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Embed widget