एक्स्प्लोर
Advertisement
मृताच्या अकाऊंटमधून 10 लाखांची चोरी, एक अटकेत
या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी रेहान इस्माईल मेमन या आरोपीला बेड्या ठोकल्या असून कय्युम खान या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबई : मृत पावलेल्या इसमाच्या बँक अकाऊंटमधून 10 लाख चोरल्याचा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या दोन जणांनी एटीएम कार्ड आणि मोबाईल चोरून साडे दहा लाख रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी रेहान इस्माईल मेमन या आरोपीला बेड्या ठोकल्या असून कय्युम खान या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
चेंबूर विभागात रहाणाऱ्या रॉल्फ कुटिनो या 57 वर्षाच्या इसमाचे 2 जून 2018 ला निधन झाले होते. यावेळी त्यांचा कुर्ला येथे रहाणारे भाऊ रिचर्ड यांनी अंत्यविधीसाठी विभागातील चार जणांना सोबत नेले. ज्यात रेहान आणि कय्युम हे दोघेही होते.
अंत्यविधी झाल्यानंतर तीन दिवसांनी रिचर्डने त्या चार जणांना पुन्हा घराची साफसफाई करण्यास पाठविले. यावेळी रेहान आणि कय्युमने या घरातील मोबाईल, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेचे दोन एटीएम लंपास केले. त्यानंतर या दोघांनी या दोन्ही खात्यामधून तब्बल साडे दहा लाख रुपये काढले होते.
जेव्हा रॉल्फ यांचे आणखी एक भाऊ रोनाल्डो कॅनडावरून भारतात आले. त्यांनी मयत भावाचे सिम चालू केले. तेव्हा त्यांना अकाऊंटमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर पैसे काढल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करीत रेहान ला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement