एक्स्प्लोर
खातेवाटपाचा तिढा सुटला, मंत्रीमंडळाची संपूर्ण यादी 'माझा' च्या हाती
या यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे उर्जा खातं देण्यात आलं असल्याची माहिती आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे.

मुंबई : आज होईल, उद्या होईल असं म्हणत सुरु असलेला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा खातेवाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. विस्तार होऊन पाच दिवस झालं तरी ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं नाही. आज, उद्या म्हणत आता थोड्याच वेळात खातेवाटप होईल असा दावाही शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी दुपारी केला होता. मात्र, आतापर्यंत खातेवाटप जाहीर झालेलं नाही. खातेवाटप झालं नसलं तरी मंत्रीमंडळाची संपूर्ण यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दरम्यान ही यादी राजभवनावर राज्यपालांच्या सहीसाठी गेली असल्याची देखील माहिती मिळाली आहे. या यादीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल तर अशोक चव्हाणांकडे सार्वजनिक बांधकाम खातं देण्यात आलं आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे उर्जा खातं देण्यात आलं असल्याची माहिती आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना नगरविकास तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण खात्याची जबाबदारी दिली असल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख गृहमंत्री, छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा, दिलीप वळसे पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खातं मिळालं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खातेवाटप यादी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना यांना पाठवली असल्याचं म्हटलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला जशी मंत्रिमंडळ खातेवाटपाची प्रतीक्षा आहे, तशीच आम्हालाही आहे. अनेक पत्रकार मित्र त्याबद्दल फोन करून विचारणा करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज सायंकाळी 7.30 वाजताच मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपालमहोदय यांना पाठवली आहे. माननीय महामहीम राज्यपालमहोदय त्यावर लवकरच शिक्कामोर्तब करतील, अशी आशा आहे, असे पाटील यांनी म्हटलं आहे. अशी आहे ही यादी काँग्रेस बाळासाहेब थोरात - महसूल अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम नितीन राऊत - ऊर्जा विजय वड्डेटीवार - ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन के.सी.पाडवी - आदिवासी विकास यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक सुनील केदार - दुग्ध विकास व पशुसंवर्धन वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण अस्लम शेख - वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर) विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे - नगरविकास सुभाष देसाई - उद्योग उदय सामंत - उच्च तंत्र शिक्षण आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण अनिल परब- परिवहन, संसदीय कामकाज शंकरराव गडाख - जलसंधारण संदिपान भुमरे - रोजगार हमी गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा दादा भुसे - कृषि संजय राठोड - वने शंभूराज देसाई - गृहराज्यमंत्री (ग्रामीण) अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री राष्ट्रवादी अजित पवार - अर्थ जयंत पाटील - जलसंपदा अनिल देशमुख - गृहमंत्री छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा दिलीप वळसे पाटील- राज्य उत्पादन शुल्क, कामगार बाळासाहेब पाटील - सहकार राजेश टोपे- आरोग्य जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण धनंजय मुंडे - सामाजिक न्याय राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन हसन मुश्रीफ - ग्रामविकास दत्ता भरणे - जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे - राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























