महत्त्वाची बातमी! इन्शुरन्स घेत असाल तर अगोदर 'हे' वाचा, LIC ने अनेक नियमात केले मोठे बदल
LIC New Rules : एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहे. या विमा कंपनीने आता आपल्या काही नियमांत बदल केला आहे .
Life Insurance: देशातील सर्वांत मोठी वीमा कंपनीन एलआयसीने आपल्या अनेक लोकप्रिया प्लॅनमध्ये बदल केला आहे. नव्या बदलानुसार एंडोमेंट प्लॅनच्या (Endowment Plan) एन्ट्रीचे वय 55 वर्षांवरून 50 वर्षे कमी करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांवर या निर्णयाचा परिणाम पडणार आहे. कंपनीने आपल्या प्रिमियममध्येही बदल केले आहेत. या नव्या नियमांना 1 ऑक्टोबर 2024 पासूनच लागू करण्यात आले आहे. विशिष्ट वयानंतर मृत्यूची शक्यता वाढते. हीच बाब लक्षात घेऊन एलआयसीने आपल्या नियमांत बदल केला आहे.
एंडोमेंट प्लॅनमध्ये नेमका काय बदल?
बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार एलआयसीने (Life Insurance Corporation of India) विमा सरेंडर करण्यासाठीदेखील नवे नियम लागू केले आहेत. एंडोमेंट प्लॅनमध्येही एलआयसीने काही बदल केले आहेत. अशा प्रकारच्या विम्यामध्ये लाईव्ह कव्हर तसेच म्यॅच्युरिटी बेनिफिट मिळते. म्हणजेच विमा घेतलेला असताना विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार पैसे दिले जातात. सोबतच मॅच्यूरिटीनंतरही वेगळा लाभ मिलतो. या बदलासंदर्भात एलआयसीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
एलआयसीजवळ 6 एंडोमेंट प्लॅन, 1 ऑक्टोबरपासून बदल लागू
एलआयसीच्या संकेतस्थळानुसार एलआयसीमार्फत एकूण 6 एंडोमेंट प्लॅन रावले जातात. यामध्ये सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लॅन (Single Premium Endowment Plan), एलायसी न्यू एंडोमेंट प्लॅन (New Endowment Plan), एलआयसी न्यू जीवन आनंद (New Jeevan Anand), एलआयसी जीवन लक्ष्य (Jeevan Lakshya), एलआयसी जीवन लाभ प्लॅन (Jeevan Labh Plan) आणि एलआयसी अमृतबाल (Amritbaal) या प्लॅन्सचा समावेश आहे. या सर्वच प्लॅन्समध्ये 1 ऑक्टोबर 2024 पासून बदल करण्यात आले आहेत.
प्रिमियममध्ये 10 टक्क्यांनी वाढ
सूत्रांच्या माहितीनुसार एलआयसीने प्रिमियमच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. सोबतच न्यू जीवन आनंद, जीवन लक्ष्य या पॉलिसींमधील सम अस्युअर्डची रक्कम 1 लाख रुपयांनी वाढवून 2 लाख रुपये केली आहे. दुसरीकडे खासगी विमा कंपन्यांनीदेखील एंडोमेंट प्लॅन्समध्ये 6 ते 7 टक्क्यांनी वाढ केली आहे.
हेही वाचा :
500000 चे 1200000 रुपये करणारी LIC ची भन्नाट स्कीम, फक्त 1000 रुपयांपासून करता येते गुंतवणूक!
LIC : एलआयसीकडून सरकारला 6 हजार 103 कोटींचा निधी सुपूर्द, कंपनीने नेमका किती मिळवला नफा?