एक्स्प्लोर

Latur News : मराठा समाज आक्रमक, आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांचा ताफा अडवला

Latur News : मराठा आरक्षणाचा मुद्दा देशमुख बंधुंनी विधानसभेत मांडला नसल्याच्या रोषातून मराठा समाजाकडून लातूरमधील रेनापूर तालुक्यात निवाडा येथे त्यांचा ताफा आडवण्यात आला. 

लातूर : लातूर (Latur) शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांचा ताफा मराठा समाजाकडून अडवण्यात आला. लातूरमधील रेनापूर तालुक्यातील निवाडा येथे हा ताफा अडवण्यात आला. दरम्यान मराठा समाजातील यो दोन्ही आमदारांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला नसल्यानं मराठा समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान निवाडा येथील रेणा साखर कारखाना येथे देशमुख कुटुंबियांनी हजेरी लावली. त्यावेळी मराठा आंदोलक त्याठिकाणी एकवटले होते. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तर आमदार धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटला आहे. त्यातच या दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. 

आम्ही तुमच्या भावनांशी एकरुप - अमित देशमुख 

दरम्यान यावेळी आमदार अमित देशमुख यांनी जमलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'सुरुवातीला देखील अनेकांनी  हा मुद्दा उचलून धरला होता. पण त्यामध्ये अनेक मतमतांतरं होती. पण आम्ही तुमच्या भावनांशी एकरुप आहोत. म्हणूनच काँग्रेस पक्ष या आंदोनाच्या पाठिशी आहे. '

कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचाही ताफा अडवला

 मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना गाव बंदी करण्याचा निर्णय राज्यातील अनेक गावांनी घेतला आहे. असाच निर्णय लातूर जिल्ह्यातील (Latur News) वाढवणा या गावाने घेतला आहे. वाढवणा हे आहे गाव उदगीर विधानसभा मतदारसंघ मधील आहे. या मतदारसंघाचे आमदार हे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) हे आहेत. मंत्री संजय बनसोडे हे आज गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलकांनी हा ताफा अडवला. यावेळी मराठा आरक्षणासाठी साठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर मांडल्या आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर गावामध्ये लोकप्रतिनिधींना येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याच पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींना येण्यास मज्जाव केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : लातूर: मराठा आरक्षण आंदोलक आक्रमक, कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
×
Embed widget