Latur Gram Panchayat Election Result 2022: लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी, 153 ग्रामपंचायतींवर फुलले कमळ
Latur Gram Panchayat Election Result 2022: ग्रामीण भागातल्या गावपुढाऱ्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपनं बाजी मारली असून 351 ग्रामपंचायतींपैकी 153 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवला आहे
![Latur Gram Panchayat Election Result 2022: लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी, 153 ग्रामपंचायतींवर फुलले कमळ Latur Gram Panchayat Election Result 2022 BJP wins in 153 Gram Panchayat elections in Latur Maharashtra Marathi latest update Latur Gram Panchayat Election Result 2022: लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी, 153 ग्रामपंचायतींवर फुलले कमळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/20/1385cbae4fea98867dcfe9b7f0e72c7f167153852253188_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं मारली बाजी मारली आहे. जिल्ह्यातल्या 153 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा तर काँग्रेसला 73 ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला आहे . माजी आमदार दिनकर माने आणि माजी आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावात परभवाचा सामना करावा लागला तर आमदार बाबासाहेब पाटील यांनी गावात वर्चस्व राखले. मलकापूर ग्रामपंचायतीवरील काँग्रेसच्या सत्तेला आमदार संजय बनसोडे यांनी सुरुंग लावला. अनेक पक्षाला हाताशी घेत विजय मिळवला.
ग्रामीण भागातल्या गावपुढाऱ्यांच्या ग्रामपंचायत निवडणुकांत भाजपनं बाजी मारली असून 351 ग्रामपंचायतींपैकी 153 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकलाय. दुसऱ्या स्थानावर काँग्रेसनं उडी मारत 73 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानी असून 42 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिल्या आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटानं 16 ग्रामपंचायती काबीज केल्या आहेत तर शिवसेना शिंदे गटानं देखील तीन ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व निर्माण केलंय. या निकालामुळं भाजपच्या गोटात मात्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झाल्यानं भाजपच्या वतीनं जिल्हाभरात जल्लोष केला जात आहे.
मोठ्या लढती
मलकापूर - काँग्रेसचे उदगीर तालुक्यातील मोठे नाव असलेले मुन्ना पाटील यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा गट भाजपा गट आणि इतर यांना यश आले आहे. संजय बनसोडे यांचे गाव मलकापूर आहे.
भोकरंबा
लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार त्रिंबक भिसे यांच्या पॅनलचा पराभव झाला. सरपंचपदी तसेच पाच जागेवर भाजपा प्रणित गटाचा ताबा आहे. अनेक वर्षाची परंपरा खंडित करण्यात भाजपाला यश मिळले आहे
शिरूर ताजबंद
राष्ट्रवादी काँग्रेस चे अहमदपूर येथील आमदार बाबासाहेब पाटील यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. सरपंच पद तसेच 14 जागेवर विजय विरोधकांना फक्त तीन जागा मिळवण्यात यश आले.
किनगाव
अहमदपूर किनगाव येथील मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपाच्या गटाने विजय मिळवत काँग्रेसची सत्ता संपवली.
आशिव
औसा विधानसभा मतदासंघातील आशिव हे गाव शिवसेनेचे दोन टर्म माजी आमदार दिनकर माने याचे आहे. मागील अनेक वर्षापासून त्याची सत्ता होती. भाजपाने येथे सत्ता स्थापन केली आहे. तसेच 15 पैकी 14 जागेवर भाजपाचा सत्ता आहे.
मुरुड
मुरुड ग्रामपंचायत निवडणुकीत स्टेजवर भाषण करताना सरपंच पदाच्या उमेदवाराचे पती अमरबापु नाडे यांचा मृत्यू झाला होता. भाजप प्रणित त्याच्या पॅनल चा विजय झाला आहे. 17 पैकी 16 जागा तसेच सरपंच पदी अमृता अमर नाडे याचा विजय झाला आहे. त्यांचे पॅनल हे मुरुड परिवर्तन पॅनल भाजपा प्रणित आहे.
रामेश्वर
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदचे आमदार रमेश कराड यांची स्थिती विजय साजरा करण्यासारखी राहिली नाही. गावातील नऊ जागाही त्यांनी ताब्यात घेतल्या मात्र सरपंच पद राखता आले नाही. कुस्तीगीर पहिलवान सचिन कराड यांनी 98 मतांनी सरपंच पद खेचून आणले आहे. महावीर केसरी, लातूर केसरी, सिध्देश्वर केसरी पटकावणारा ,पुणे येथे झालेली महारष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 97 किलो गटात तिसरा आलेला सचिन कराड याने रमेश कराड यांना चारीमुड्या चीत करत एक हाती अपक्ष सरपंचपद खेचून आणले आहे
- एकूण ग्रामपंचायत- 351
- शिवसेना ( ठाकरे गट ) - 16
- शिवसेना शिंदे गट - 03
- भाजप- 153
- राष्ट्रवादी- 42
- काँग्रेस- 73
- इतर- 58 (यात १६ ग्रामपंचायत बिनविरोध आहेत ..ज्या सर्वपक्षीय आहेत )
- एकूण - 348
- तीन ग्रामपंचायतीचं सरपंच पद रिक्त ( फॉर्म भरलेच नाही )
लातूर जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल.
औसा तालुका
- एकूण 60 ग्रामपंचायत ( दोन बिनविरोध )
- कॉंग्रेस - 20
- राष्ट्रवादी - 03
- शिवसेना ( ठाकरे ) - 15
- भाजप - 10
- इतर - 10
देवणी तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 08
- कॉंग्रेस - 02
- भाजप - 06
जळकोट तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 12
- राष्ट्रवादी - 01
- कॉंग्रेस - 02
- भाजप - 09
शिरूर अनंतपाळ तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 11
- भाजप - 09
- कॉंग्रेस - 02
निलंगा तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 62
- भाजप - 39
- कॉंग्रेस - 10
- राष्ट्रवादी - 01
- शिवसेना शिंदे गट - 06
- इतर - 06
अहमदपूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 42
- भाजप - 23
- राष्ट्रवादी - 18
- इतर - 01
उदगीर तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 26
- राष्ट्रवादी - 13
- कॉंग्रेस - 05
- भाजप - 05
- शिवसेना ( शिंदे गट ) - 01
- इतर - 01
रेणापूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 33
- भाजप - 20
- काँग्रेस - 12
- शिवसेना ( शिंदे गट ) - 01
लातूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 44
- काँग्रेस - 18
- भाजप - 13
- इतर - 13
चाकूर तालुका
- एकूण ग्रामपंचायत - 46
- भाजप - 19
- राष्ट्रवादी - 06
- काँग्रेस - 02
- शिवसेना ( ठाकरे गट ) - 01
- शिवसेना ( शिंदे गट ) - 01
- इतर - 17
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)