Hasan Patel passed away : शेतकरी नेते पाशा पटेलांना पुत्र शोक, अॅड. हसन पटेल यांचं निधन
शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांना पुत्रशोक झाला आहे. आज सकाळी पाशा पटेल यांचे पुत्र अॅड. हसन पटेल (Hasan Patel) यांचं यांचं निधन झालं आहे.
Hasan Patel passed away : शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांना पुत्रशोक झाला आहे. आज सकाळी पाशा पटेल यांचे पुत्र अॅड. हसन पटेल (Hasan Patel) यांचं यांचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी हसन पटेल यांचे निधन झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची मूत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आहे. आज दुपारी दोन वाजता लोदगा येथे त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अॅड. हसन पटेल यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. हसन पाशा पटेल हे मागील काही वर्षांपासून मुंबई हायकोर्टात वकिली करत होते. लॉकडाऊनमध्ये ते लातूरमध्ये आले होते. त्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळं ते लातूरमध्ये होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लातूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.