एक्स्प्लोर

ABP Majha Exclusive : एकीकडे बेरोजगारीचे संकट, दुसरीकडे डोक्यात भगतसिंहांचे विचार, लोकसभेत घुसलेल्या लातूरच्या अमोल शिंदेची धक्कादायक INSIDE STORY

Amol Shinde Inside Story : अमोल शिंदेने दिवसभर मजुरी केली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून भगतसिंहांचा फोटो आणला. लोकसभेत घुसलेल्या ज्या सहा तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना जोडणारा दुवा म्हणजे भगतसिंह होय.

लातूर : देशातील सर्वोच्च अशी सुरक्षा भेदून संसदेच्या परिसरात आणि लोकसभेमध्ये चार तरूण घुसले आणि एकच गोंधळ सुरू झाला. भारत माता की जय, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा देत त्यांनी गोंधळ घातला हे अवघ्या देशाने पाहिले. या प्रकरणात आता एकूण सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये लातूरच्या अमोल शिंदे (Amol Shinde) नावाच्या युवकाचा समावेश आहे. 

मिल्ट्री भरतीमध्ये सहा वेळा अपयशी आलेल्या या युवकाला नैराशेने ग्रासले, त्याच्यासारख्याच बेरोजगार तरूणांनी एकत्र येऊन हा गोंधळ घातल्याचं आता स्पष्ट झालं. या सर्व तरूणांना एकत्र जोडणारा एक दुवा आहे आणि तो म्हणजे भगतसिंह. अटक करण्यात आलेल्या सर्व तरूणांना भगतसिंह या फेसबुक पेजने एकत्र आणले.

दिवसभर मजुरी केली अन् त्या पैशातून भगतसिंहांचा फोटो आणला

दिवसभर पाठीवर फवारा घेऊन एका शेतात फवारणी केली अन् त्यातून मिळालेल्या पैशातून अमोल शिंदेने लातूर गाठले आणि त्या ठिकाणाहून भगतसिंहांचा एक फोटो आणला. घर लहान असल्याने या फोटोला धुरळाही लागू नये म्हणून जीवापाड जपला. भगतसिंहांच्या सोबत राजगुरू आणि सुखदेव यांचेही फोटो त्याने आणल्याचं पालकांनी सांगितलं. 

टीव्हीवर आपल्या मुलाला पाहिलं आणि पालकांच्या काळजाचं पाणीपाणी झालं. दिवसभर रोजंदारी करणारा, काबाडकष्ट करणारा आपला पोरगा, मिल्ट्री भरतीसाठी सहावेळा अपयश आल्यानंतर नैराश्य आलेला आपला पोरगा, पोलीस भरतीसाठी दिवसभर पळणारा आपला पोरगा या अशा अवस्थेत सापडल्याचं टीव्हीवर दिसलं आणि त्याच्या अशिक्षीत पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली. 

सहावेळा पोलीस भरतीमध्ये अपयश

पोलीस आणि मिल्ट्री भरतीची आस असलेल्या तरुण, मागील अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता पण हाती निराशा आलेली. देशातील अनेक ठिकाणी जात अमोलने भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र हाती काही लागले नाही. त्याने काय केले हे पोलीस आल्यावर कळाले. आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं, त्याने कोणतंही देशविघातक कृत्य केलं नाही, त्याला सोडावं अशी मागणी करत अमोलची आई ओक्साबोक्सी रडत होती. पोराशी बोलणं नाही करून दिलं तर आपण आत्महत्या करू असा इशारा देणारे अमोलचे वडील धनराज यांच्या डोळ्यातही आसवं दाटली होती आणि त्यांना पुढे काय होणार याची चिंता लागली होती. 

देशविघातक कृत्य केलं नाही, पालकांच्या डोळ्यात पाणी

अनेक प्रयत्न करूनही नोकरी नाही, त्याचवेळी भगतसिंहांच्या विचारांशी ओळख झाल्याने डोक्यात क्रांतीकारक विचार अशी काहीशी स्थिती अमोलची झाली. भगतसिंहाप्रमाणे काहीतरी वेगळं केलं तर आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल, आपल्या बेरोजगारावर काहीतरी मार्ग निघेल असं अमोल शिंदेला वाटलं असावं कदाचित. अमोलला कुठलंही व्यसन नाही, तो दिवसभर रोजंदारीचं काम करायचा, दिवसभर पळायचा. आपल्या पोरानं कोणतंही देशविघातक कृत्य केलं नाही असं त्याच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी या मुलांची शिक्षा माफ करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. देशाच्या संसदेची सुरक्षा भेदून आत प्रवेश करणे हे चुकीचंच असलं तरीही त्यामागची भावना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maha Kumbh 2025 : मुस्लिमांचं वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणार,महाकुंभमध्ये होणार 27 तारखेला धर्म संसदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Embed widget