एक्स्प्लोर

Kolhapur Police : कोल्हापूर परिक्षेत्रातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश; कोल्हापुरात तिघांना मुदतवाढ 

Kolhapur Police : कोल्हापूर परिक्षेत्रातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवारी बदली आदेश काढले.

Kolhapur Police : कोल्हापूर परिक्षेत्रातील 8 पोलिस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी मंगळवारी बदली आदेश काढले. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक शशीराज पाटोळे यांच्यासह जयसिंह रिसवडकर यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी आणि गारगोटीमधील पोलिस निरीक्षक संजय मोरे आणि श्रीप्रसाद यादव यांची सांगलीत बदली झाली आहे. अनिल तनपुरे यांची सांगलीतून कोल्हापुरात बदली झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे भगवान खारतोडे यांची पुणे ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. विनोद घुगे यांची पुणे ग्रामीणमधून सोलापूर ग्रामीणला बदली झाली आहे. 

विश्वास नांगरे-पाटील यांना पदोन्नती; राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या 

दरम्यान, राज्य पोलिस दलातही खांदेपालट झाली आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते (Sadanand Date) यांची राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील(Vishwas Nangre Patil) यांची पदोन्नतीने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

अमिताभ गुप्ता यांची बदली, पिंपरी चिंचवडचे आयुक्तही बदलले 

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमिताभ गुप्ता हे आता कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलिस महासंचालक असतील. विनय कुमार चौबे हे आता पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त असतील. अंकुश शिंदे यांची पिंपरीवरून बदली करण्यात आली असून ते आता नाशिकचे पोलिस आयुक्त असतील. 

दुसरीकडे, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची नियुक्ती नवी मुंबई पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस सहआयुक्त राजवर्धन यांची पदोन्नतीने अपर पोलिस महासंचालक, सुरक्षा महामंडळ या ठिकाणी नेमणूक झाली आहे. मधुकर पांडे यांची मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर प्रशांत बुरडे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलिस महासंचालक असतील. सत्यनारायण चौधरी बृहन्मुंबई कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलिस सहआयुक्त असतील. नितीश मिश्रा यांची बृहन्मुंबई आर्थिक गुन्हे पोलिस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

प्रवीण पवार हे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असतील तर सुनिल फुलारी हे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असतील. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget