Sharad Pawar on Kolhapur : शरद पवार साहेबांचे कोल्हापूरवर अधिकचे प्रेम, साहेबांचा भल्या पहाटे फोन, ए. वायचं काय चाल्लंय? हसन मुश्रीफांनी सांगितला किस्सा!
Sharad Pawar : राज्याच्या राजकारणातील चालता बोलता इतिहास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Sharad Pawar : राज्याच्या राजकारणातील चालता बोलता इतिहास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 82 वा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीकडून (NCP) त्यांच्या वाढदिनी व्हर्च्युअल रॅलीचे विविध ठिकाणी आयोजन केले होते. कोल्हापूरमध्येही (Kolhapur) व्हर्च्युअल रॅली पार पडली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Sharad Pawar) यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. व्हर्च्युअल रॅलीत मुश्रीफ यांनी वयाच्या 82 व्या वर्षी किती शरद पवार किती सक्रीय आहेत तसेच भल्या पहाटे त्यांचा दिनक्रम कसा सुरु होतो याबाबत किस्सा सांगितला.
पवार साहेबांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम
यावेळी बोलताना हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on Sharad Pawar) म्हणाले, या वयातही शरद पवार साहेब यांचे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये काही घडलं, तरी ते पटकन फोन करतात, पवारांचे कोल्हापूरवर अधिकचे प्रेम आहे. त्यामुळे साहेब काही झालं, तरी भल्या पहाटे फोन करतात, ए. वायचं काय चाल्लंय? आर. के. काय चाल्लंय? अशी सगळ्यांची विचारपूस करतात.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर राष्ट्रवादीत धुसफूस सुरु आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला. त्यानंतर शिंदे गटाच्या व्यासपीठावरही दिसून आले होते. त्यामुळे चर्चा अधिकच रंगली होती. मात्र, अजित पवार यांनी ए. वाय. पाटील यांची नाराजी दूर करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांना शांत करण्यात राष्ट्रवादीला यश आल्याचे दिसून येत आहे. हे असतानाच आर. के. पवार आणि अनिल साळोखे या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये एकेरी उल्लेख करत वाद झाला होता.
शाहू-फुले-आंबेडकर पुरोगामी विचार राजकारणात जिवंत ठेवला
दरम्यान, व्हर्च्युअल रॅलीत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, (Hasan Mushrif on Sharad Pawar) साहेब व्यक्ती नाहीत संस्था आहे. 60 वर्षाच्या लोकशाही प्रणाली त्यांना जी संधी मिळाली त्यातून त्यांनी देश आणि राज्याच्या विकासासाठी विकासासाठी प्रयत्न केले. शाहू-फुले-आंबेडकर पुरोगामी विचार अशा राजकारणात जिवंत ठेवला आणि तेवत ठेवला. साहेबांनी मनापासून प्रेम केले बळीराजावर. काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या बळीराजासाठी साहेबांनी आपल्या कारकीर्दीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
देशाचे कृषिमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून (Sharad Pawar )अनेक निर्णय घेतले. 10 वर्षाच्या कृषिमंत्रीच्या काळात देशाला निर्यातदार बनवला. आज साखर कारखानदारी उभी राहिली त्याचे श्रेय वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण ते पवार साहेबांचे आहे.
इथेनॉल निर्मिती असेल, कारखानादारीत उपपदार्थ बनवल्याशिवाय ती फायद्यात येणार नाही त्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो वा शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रयोग राबवणे यासाठी साहेबांनी आयुष्य वेचले. शिर्डी येथील शिबिरात साहेब दुसऱ्या दिवशी आले. त्यानंतर दोनच दिवसात त्यांना डिस्जार्च मिळाला. जनता हे साहेबांचे टॉनिक आहे. राज्याच्या कोणताही जिल्ह्यात घटना घडली की सकाळी साहेबांचा फोन आल्याशिवाय राहत नाही. 83 वर्षी इतकी स्मरणशक्ती, अफाट हजरजबाबीपणा यामुळे साहेबांवर असंख्य लोक जीव ओवाळून टाकायला आमच्यासारखे तयार असल्याचे मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif on Sharad Pawar) नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या