Bharat Jodo Yatra : कॉम्प्युटरला विरोध करणारेच आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत; सतेज पाटलांचा भाजपवर घणाघात
Bharat Jodo Yatra : कधीकाळी कॉम्प्युटरला विरोध करणारेच आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला.
Bharat Jodo Yatra : कधीकाळी कॉम्प्युटरला विरोध करणारेच आज कॉम्प्युटरच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. भाजपकडून देशात द्वेष पसरवण्याचे काम केलं जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.
भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलाच मेळावा कोल्हापूरमध्ये होत आहे. या मेळाव्याला दिग्विजय सिंह महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहर, 13 नगरपालिका तसेच नगरपंचायत आणि 1239 गावांमधून 100 दिवस 13 एलईडी स्क्रीन्सच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचा भारतातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम कसा राबवण्यात येईल याबाबत सतेज पाटील यांनी यावेळी माहिती दिली.
सतेज पाटील म्हणाले, संगणकाला विरोध करणारी आज त्याच माध्यमातून द्वेष पसरवत आहेत. भारत जोडला गेला पाहिजे. या देशात काँग्रेसने मोठं काम केलं आहे. सरकारमधील पत्येक माणूस पक्षाचा बांजू मांडत असतो. देशात गेल्या आठ वर्षात वातावरण बिघडून गेलं आहे. समाजात दुफळी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरबा असेल, तर इतर धर्मियांनी येऊ नये असे म्हटले जाते. यापूर्वी असं कधी होतं नव्हतं. ते पुढे म्हणाले, राहुल यांनी भारत जोडो यात्रा जनतेसाठी हाती घेतली आहे. भविष्यातील पिढी सर्वधर्मसमभाव मानणारी असली पाहिजे, यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहेत.
यात्रा लोकांपर्यत पोहोचली पाहिजे
सतेज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यात 13 एलईडी व्हॅन प्रत्येक तालुक्यातील जातील. सकाळी साडे सहा वाजल्यापासून सुरुवात होईल. पुढील 100 दिवस या व्हॅन फिरत राहतील. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या व्हॅन जातील. उद्यापासून या व्हॅन जातील.
दुसरीकडे भारत जोडो यात्रेत सामील होऊ इच्छिणाऱ्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत नावे द्यावीत 10 हजार लोक गेली पाहिजेत, असं नियोजन केलं पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, महाराष्ट्र मध्ये यात्रा आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यानी यात्रेत सहभागी व्हावे,ज्याचा फिटनेस आहे, जे चालू शकतात, रस्त्यावर झोपायची तय्यारी असेल अशा कार्यकर्त्यांनी यात्रात सहभागी व्हावे, वेळ आली तर मी सुद्धा रस्त्यावर झोपेन असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
- Bharat Jodo Yatra : कोल्हापुरात सतेज पाटलांच्या संकल्पनेतून 'भारत जोडो'साठी तगडे नियोजन; 1239 गावे, 100 दिवस अन् 13 एलईडी स्क्रीन्स!
- Chandrakant Patil : आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टीची निदर्शने