Bharat Jodo Yatra : कोल्हापुरात सतेज पाटलांच्या संकल्पनेतून 'भारत जोडो'साठी तगडे नियोजन; 1239 गावे, 100 दिवस अन् 13 एलईडी स्क्रीन्स!
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये प्रवेश करत आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये प्रवेश करत आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून कोल्हापूरमध्ये आज काँग्रेसचा मेळावा होत आहे.
माजी गृहराज्यमंत्री काँग्रेस आमदार जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रांतर्गत हा राज्यातील पहिलाच मेळावा असेल. कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहर, सर्व 13 नगरपालिका तसेच नगरपंचायत आणि 1239 गावांमधून 100 दिवस 13 एलईडी स्क्रीन्सच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचा भारतातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हे नियोजन करण्यात येत आहे.
सध्या राहुल यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकमध्ये आहे. यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारीतून सुरु झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये तिची समाप्ती होणार आहे. एकूण 3,500 किमीचा प्रवास करून 12 राज्यांमधून ही यात्रा जाईल. संपूर्ण दौरा पूर्ण होण्यासाठी तब्बल 150 दिवस लागतील.
सात नोव्हेंबरला राहुल यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात
दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 383 किमीचा प्रवास करणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेतून बेरोजगारी आणि ढासळलेली अर्थव्यवस्थेवरून भाजपवर हल्लाबोल करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
- Chandrakant Patil : आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टीची निदर्शने
- Kolhapur Crime : शिरोळ तालुक्यातील वृद्धाचा लेकीकडे जाताना एसटीमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; आरोग्य केंद्रात एसटी नेऊनही जीव वाचवण्यात अपयश