Chandrakant Patil : आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही, म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टीची निदर्शने
चंद्रकांत पाटील यांनी आई वडिलांना शिव्या द्या चालेल, पण पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही, असे वक्तव्य केल्याने कोल्हापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Chandrakant Patil : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई वडिलांना शिव्या द्या चालेल, पण पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही, असे जाहीरपणे वक्तव्य केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापूरसह राज्यभरातून वेगगेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आपकडून निषेध करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आईवडिलांवरून शिवी देण्याची पद्धत आहे असेही म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने कोल्हापूर जिल्ह्याची बदनामी झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने गुरुवारी पुणे भाजपकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघामधील निवडणूक आणि त्यावेळी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांवरही भाष्य केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “हातकणंगलेमध्ये रोज उठून राजू शेट्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देत होते. माझे ते खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं की, तुम्ही चूक करत आहात. परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले की दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते 40 वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले, की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे, पण चंद्रकांत पाटील मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाहीत.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सडकून टीका केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या