Sanjay Mandlik on Satej patil : प्रवक्ते सांगतात तुम्ही बोलू नका, आम्ही काय बोलायचं, आमचा अधिकार; मंडलिकांची सतेज पाटलांवर टीका
खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर शहरातील कोटीतीर्थ परिसरातील स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![Sanjay Mandlik on Satej patil : प्रवक्ते सांगतात तुम्ही बोलू नका, आम्ही काय बोलायचं, आमचा अधिकार; मंडलिकांची सतेज पाटलांवर टीका Sanjay Mandlik on Satej patil says Do not take credit for the work done by Rajarshi Shahu Maharaj kolhapur loksabha Sanjay Mandlik on Satej patil : प्रवक्ते सांगतात तुम्ही बोलू नका, आम्ही काय बोलायचं, आमचा अधिकार; मंडलिकांची सतेज पाटलांवर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/21/9f5f9296fa484d848734d2b37c09bf351713687036459736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचे (Kolhapur Loksabha) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या प्रचारासाठी कोल्हापूर शहरात महायुतीकडून रिक्षा रॅली काढण्यात आली. कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.
तत्पूर्वी, खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर शहरातील कोटीतीर्थ परिसरातील स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन घेऊन शहरातील प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील मुख्यमार्गांवर ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील, अशा विश्वास माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही घेऊ नका
दरम्यान, यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांचा प्रवक्ते असा उल्लेख खोचक टीका केली. सतेज पाटील यांनी कालबाह्य मुद्यांवरून मंडलिक कुटुंबीय टीका करत असल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना संजय मंडलिक म्हणाले की, आम्ही सुद्धा तेच म्हणत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही घेऊ नका. 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी विकासाचं काम केलं. तुम्ही तुमच्या कामाचे जनतेला सांगा, असे संजय मंडलिक म्हणाले. उमेदवार मागील शंभर वर्षातील सांगतात, प्रवक्त्यांनी सांगायचं तुम्ही बोलू नका. आम्ही काय बोलायचं हा आमचा अधिकार आहे, त्यांनी काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना सल्ला देणार नाही, आम्हाला त्यांनी सल्ला देऊ नये, असेही संजय मंडलिक म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)