सत्ता वाईट! पूर्वी जेवायला बोलवायचे, आता चहा प्यायलाही कोणी बोलवत नाही, सदाभाऊंनी व्यक्त केली खदखद
माझं मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेले आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिलो असे म्हणत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी खंत व्यक्त केली आहे.
Sadabhau Khot : सत्ता ही वाईट असते ती मी भोगली आहे. माझी गाडी आली की हॉर्न वाजायला लागल की मागून दहा गाड्या लागायच्या. मात्र, माझं मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेले आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिलो असे म्हणत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी खंत व्यक्त केली आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेली आणि गाडीवालाही गेला
दरम्यान, बोलण्यात कधी हाय गय करायची नाही. मी बोलतच होतो की हातकणंगले मीच लढवणार आहे. मी नाही म्हणलं तर माणसं माझ्यासोबत राहतील का? असा सवाल यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. लोक विचारायचे भाऊ कसं काय? मी म्हणायचं जमलं, मात्र मला माहित होतं जमलेला नाही असंही खोत म्हणाले. दरम्यान, सत्ता ही वाईट असते ती मी भोगली आहे. प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर रांगा लागायच्या. मला वाटायचं आपलं वजन वाढायला लागलाय. मात्र, मंत्रीपद गेलं आणि गाडी बी गेली आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिल्याचे खोत यावेळी म्हणाले. आधी मला एक एक वाजेपर्यंत फोन करायचे, मी उचलायचो, मात्र आता मी फोन केला तर गडीही फोन उचलत नाही असे खोत म्हणाले.
आता साधा चहा प्यायला देखील कोणी बोलवत नाही
माझं मंत्रीपद गेल्यानंतर एकाही खासदाराने गाडीची काच खाली केली नसल्याचे खोत म्हणाले. मी मंत्री असताना घरी आले की मी त्यांना सोलापुरी भाकरी ठेचा, शेंगा चटणी द्यायचो. गडी खाताना म्हणायचा मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही. खाणारा घडी खाऊन थकून जायचा. मात्र मी सांगायचो त्यांना खाऊ घाला थोडे कामाला येतात. मात्र आता कुठे कोण आहे असंही खोत म्हणाले. पूर्वी जेवायला बोलवायचे मात्र आता साधा चहा प्यायला देखील कोणी बोलवत नाही असंही खोत म्हणाले.
हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्या इच्छुक होते सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली होती. यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये मात्र, सदाभाऊ खोत यांनी स्थान मिळालं नाही. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मात्र, महायुतीत शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटली आहे. पुन्हा सेनेने धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळं सदाभाऊ खोत यांन अनेकवेळा खंत व्यक्त केली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सदाभाऊ खोतांना भाजप काही संधी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: