एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल; बाळासाहेब थोरातांना विश्वास 

सोशल मीडियाच्या माध्यमातून यात्रा दाखवण्याचा सतेज पाटील यांनी आयडिया काढली. त्यांना जे सुचते ते वेगळे, हटके असतं. व्हॅनच्या माध्यमातून राबवत असलेला हा सुंदर उपक्रम असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलाच मेळावा कोल्हापूरमध्ये होत आहे. या मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 

थोरात म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून यात्रा दाखवण्याचा सतेज पाटील यांनी आयडिया काढली. त्यांना जे सुचते ते वेगळे, हटके असतं. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून राबवत असलेला हा सुंदर उपक्रम आहे. ते पुढे म्हणाले, लाखोंच्या संख्येने, लहान, वयस्कर माणसे या यात्रेत सहभागी होत आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या टी शर्टवर टीका केली, पण देशभरातून टीका करणाऱ्यांवर टीका झाली. त्यांनी यात्रा काढण्यामागचा हेतू पहा असे सुचवले. 

काँग्रेसची आतापर्यंत वाटचाल राज्यघटनेनुसार होती, पण 2014 पासून माणूस माणसांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे ही यात्रा काढून राहुल गांधी पुन्हा माणूस माणसांजवळ आणायचे प्रयत्न करत असल्याचे थोरात म्हणाले. 

कुणाच्या डोक्यात येत नाही ते बंटी पाटील यांच्या डोक्यात येते

यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनीही सतेज पाटील यांच्या संकल्पनेला दाद देत कौतुक केले. कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गावा गावात यात्रा पोचवत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून बंटी पाटील यांना धन्यवाद देत असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार जनतेच्या मनात, देशात अशांतता निर्माण केले जात आहे, हे वातावरण बदलण्यासाठी आणि देश पुन्हा एकसंध ठेवण्यासाठी ही यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी वचनभ्रष्ट झालेत

यावेळी एच. के. पाटील यांनी नरेंद्र मोदी वचनभ्रष्ट झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. युवकांना रोजगाराचे आश्वासन दिले मात्र 8 वर्षात 8 कोटींपेक्षा जास्त उद्योग बाहेर गेले. भारत जोडो यात्रा म्हणजे लोकांची मने जोडायची आहेत. दिग्विजय सिंह यांनी जो कार्यक्रम दिला आहे, या यात्रेने देशातील वातावरण आणि इतिहास बदलून जाईल हे निश्चित असल्याचे पाटील म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

धक्कादायक! अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नराधमाने आधी अश्लील व्हिडिओ दाखवले

पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  

व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake : Eknath Shinde Manoj Jarange यांच्यासाठी रेड कार्पेट टाकतात, हाकेंचा हल्लाबोलRaj Thackeray : विधानसभेला मुस्लीम समाजाचं मतदान  मविआला मिळणार नाही : राज ठाकरेMNS Mumbai School Issue : बदलापूर प्रकरणानंतपर मनसेकडून मुंबईतील शाळाच्या सुरक्षेची पाहणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
Onion : सरकार कांद्याचा बफर स्टॉक बाजारात आणणार? कांद्याचे दर पाडणार? स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
धक्कादायक! अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नराधमाने आधी अश्लील व्हिडिओ दाखवले
धक्कादायक! अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, नराधमाने आधी अश्लील व्हिडिओ दाखवले
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर

खूशखबर! बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये बंपर भरती, आजच अर्ज करा!

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी

सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?

Embed widget