Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday: राज्यावर संकट असताना छत्रपती शाहू महाराज वाड्यावर न राहता जनतेसोबत राहिले; शरद पवारांकडून गौरवोद्गार
राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी वाड्यावर न राहता ते जनतसोबत राहिले. अनेक संस्था उत्तमरित्या चालवत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले.
Chhatrapati Shahu Maharaj 75th birthday : राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी वाड्यावर न राहता ते जनतसोबत राहिले. अनेक संस्था उत्तमरित्या चालवत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गौरवोद्गार काढले. शरद पवार यांच्या हस्ते करवीर अधीपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा चांदीची गदा, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, हा सोहळा आनंद देणारा आहे. अनेक राजवाडे होऊन गेले, पण त्यांची राज्ये त्यांच्या नावाने केली होती, पण एकच राज्य असं होतं जे कुटुंबाच्या नावाने नव्हते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं राज्य रयतेचं राज्य होतं. ते हिंदवी स्वराज्य होतं. हा इतिहास छत्रपतींच्या घराण्यांनी जतन केला आहे.
समतेची विचारधारा कृतीमध्ये आणण्यासाठी राजा कोणता याची चर्चा देशात होते तेव्हा पहिल्यांदा नाव छत्रपती शाहू महाराजांचे येते. ही शाहू महाराजांची विचारधारा, परंपरा सातत्याने छत्रपतींनी जपली याचा आनंद आहे. छत्रपती असूनही त्यांचे लक्ष शेवटच्या माणसासाठी आहे. महाराष्ट्रात अनेक संकटे आली, महापूर आला, कोरोनाचे संकट आले तेव्हा छत्रपती वाड्यात राहिले नाहीत, ते सामान्य माणसांचे दु:ख कमी करण्यासाठी रस्त्यावर आले.
पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, ज्या शाहू महाराजांनी खासबाग मैदानाची निर्मिती केली त्याच मैदानावर कार्यक्रम होणार हा आगळावेगळा योगायोग आहे. ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक कुस्तीमध्ये मिळवलं. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या तालीम आहेत त्यांना मॅटिंग देणं ही वाढदिवसाची भेट ठरेल, असं मला वाटतं. त्यांचं दुसरं प्रेम आहे फुटबाॅलवर. त्यामुळे येत्या वर्षभरात आम्ही फुटबाॅलची मोठी स्पर्धा कोल्हापुरात घेऊ. पंचगंगेचं प्रदुषण 50 टक्क्क्यांपर्यंत याची खात्री देतो.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणाले की, अनेकांचे वाढदिवस पाहिले, पण श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा वाढदिवस आज पर्यंत इतका भव्यदिव्य कोणी पाहिला नाही. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की या प्रसंगामध्ये आपण सहभागी आहोत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जेव्हा जेव्हा कार्यक्रमाला येतात त्यावेळेला इतरांना जास्त बोलायला येतात अतिशय कमी वेळामध्ये मोजक बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. प्रचंड व्यासंग असणारे उच्चविद्याभूषित महाराज दहा दहा हजार पुस्तक जतन करणारे आणि त्या पुस्तकांच्या संग्रहातील अनेक पुस्तक वाचून इतरांची चर्चा करणारे आपले महाराज हे सर्वांशी बरोबरीने वागतात.
दरम्यान, यावेळी मनोगत व्यक्त करताना सतेज पाटील म्हणाले की, आदरणीय शाहू महाराज फुटबॉल असू दे कुठलाही खेळ असू दे सर्व धर्म समूहाच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये त्यांचे उपस्थिती आमच्यासाठी पर्वणी असते. हसन मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज त्यांचा आपण सत्कार करत आहोत. शाहू महाराजांच्या या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मी मनःपूर्वक अभिष्टचिंतन करतो. छत्रपती समारंभ करायचा ठरलं त्यावेळी व्ही. बी पाटलांनी कुस्तीची कल्पना मांडली. लोकांबरोबर राहायचं, लोकांना जे आवडते ते करायचं लोकांसाठी काम करायचं हे आजपर्यंत शाहू महाराजांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या