Mahadevrao Mahadik, Raju Shetti : माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टींच्या भेटीने राजकीय भूवया उंचावल्या, नेमकी चर्चा काय झाली?
Mahadevrao Mahadik, Raju Shetti : राजू शेट्टी यांची एक ला चलो रे भूमिका कायम असली तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने असणार की आणि अन्य उमेदवार असणार? याची चर्चा अजूनही सुरूच आहे.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raje Shetti) आणि माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची भेट झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची (Hatkanangle Lok Sabha Constituency) चांगलीच चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यानच माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी यांची भेट झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्यानंतर उभय नेत्यांची भेट संजय घोडावत महाविद्यालयात झाली. यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चा सुरू आहे. या मतदारसंघांमधून राजू शेट्टी यांची एक ला चलो रे भूमिका कायम असली तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने असणार की आणि अन्य उमेदवार असणार? याची चर्चा अजूनही सुरूच आहे. शिंदे गटामध्ये गेलेले खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये मतदारसंघांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यांना या नाराजीचा सामना सुद्धा करावा लागला आहे.
अलीकडेच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा माने यांच्या कार्यशालीवर जाहीरपणे टीका केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने हेच उमेदवार असले तरी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार महाडिक आणि राजू शेट्टी यांची झालेली भेट राजकीय भूवया उंचावणारी आहे.
भेटीनंतर राजू शेट्टी काय म्हणाले?
दरम्यान,या भेटीनंतर आप्पा माझ्यासोबत असतील अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांची भेट झाल्यानंतर राजू शेट्टी यांनी सुरुवातीपासूनच मदत केली असल्याचे म्हणाले. राजू शेट्टी यांचं काम आघाडी व पक्षापेक्षा वेगळा असल्याचे ते म्हणाले. शेतकरी चळवळला योग्य दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीतला काही दिवसांचा कालावधी राहिला असतानाच महाडिक आणि राजू शेट्टी यांची झालेली भेट निश्चितच राजकीय भूवया उंचावल्या आहेत. या दोघांमध्ये आणख बरीच चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
इतर महत्वाच्या बातम्या