Shahu Maharaj : तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येईल; शाहू महाराजांचं लोकसभेबाबत सूचक वक्तव्य
Shahu Maharaj, Kolhapur : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. दरम्यान आता शाहू महाराजांनीच लोकसभेबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
Shahu Maharaj, Kolhapur : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज (Shahu Maharaj) निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. दरम्यान आता शाहू महाराजांनीच (Shahu Maharaj) लोकसभेबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. शाहू छत्रपती महाराज यांनी पुन्हा दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत दिले आहेत. तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल, असे सूचक वक्तव्य शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) केले आहे. 'ब्रेकिंग न्यूज'या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शाहू महाराज (Shahu Maharaj) उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले शाहू महाराज?
तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल. ब्रेकिंग न्यूज ऐषोराम करण्यासाठी नाही तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असेल. त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन देखील लागणार आहे, असे शाहू महाराज म्हणाले आहेत. लोकसभेच्या उमेदवारीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेलाय असं मला कळलं. मी मुंबईला सुद्धा गेलो नाही. आपल्याला कोल्हापूरच्या विकासासाठी काम करायचा आहे. ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर मी तुम्हाला नक्की बोलवेन, अशी ग्वाही शाहू महाराज छत्रपती यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना दिली. त्यामुळे शाहू महाराजही लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. दरम्यान, शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीकडून कोणता उमेदवार देण्यात येईल, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.
शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल : शरद पवार
लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल", असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी ते सहमत आहेत. ते राजकीय पक्षात सामील झालेलं त्यांना पाहिलेलं नाही, असं शाहू महाराज यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी न्यू पॅलेस येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी शाहू महारांजाच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं होते.
इतर महत्वाच्या बातम्या