Kolhapur Football : कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम लांबणीवर, पण दुसरीकडे चाहत्यांसाठी मोठी 'खुशखबर'!
Kolhapur Football : कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम लांबणीवर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला असला, तरी राष्ट्रीय पातळीवरील सामने पाहण्यासाठी संधी लाभणार आहे.
Kolhapur Football : कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम लांबणीवर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला असला, तरी राष्ट्रीय पातळीवरील सामने पाहण्यासाठी संधी लाभणार आहे. देशातील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे. 7 ते 15 जानेवारीला ‘ड’ गटाचे विभागीय सामने कोल्हापुरात होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन याचे संयोजन करणार आहे. याबाबतची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घोषणा केली आहे.
ड गटामध्ये यजमान महाराष्ट्रासह बंगाल, मध्यप्रदेश, दमण आणि दादरा, छत्तीसगढ, हरियाणा यांचा गटात समावेश आहे. संतोष ट्रॉफीसाठी सहा गटात पात्रता सामने होतील. हे सामने दिल्ली, कोझिकोड (केरळ), आसाम, भुवनेश्वर (ओडिशा) आणि कोल्हापूरचा समावेश आहे. स्पर्धेत दररोज तीन सामने होणार आहेत.
गट IV: पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दादरा, हरियाणा
7 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
- हरियाणा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
- मध्य प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
9 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
- छत्तीसगड विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
- हरियाणा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
11 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
- बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
- छत्तीसगड विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
13 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
- महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
- बंगाल विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
15 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
- मध्य प्रदेश विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
- महाराष्ट्र विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम लांबणीवर
दरम्यान, 4 डिसेंबरपासून सुरु होणारा कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम लांबणीवर पडला आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली 16 संघांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या विद्यापीठस्तरीय विभागीय व आंतरविभागीय स्पर्धा मिरज येथे होणार आहेत. यासाठी संघातील काही खेळाडू सहभागी होणार आहेत. यामुळे यंदाचा कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाची तारीख बदलण्याचा निर्णय चर्चेनंतर घेण्यात आला आहे. दरम्यान, हंगाम 10 डिसेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचे प्राथमिक स्तरावर ठरले आहे.
हंगामासाठी (kolhapur Football) संघांकडूनही जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा गर्दी अन् जोश अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शाहू स्टेडियमवरही जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी 16 संघांची तयारी सुरु आहे. सीनियर सुपर 8 व सुपर 8 अशा दोन गटांतर्गत दररोज 2 असे एकूण 56 सामने होतील. चालू हंगामासाठी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन
दुसरीकडे, फुटबॉल महासंग्रामकडून कोल्हापूर फुटबॉलला शिस्त लागावी यासाठी फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएसए लीग व सर्व स्पर्धा संपल्यानंतर फुटबॉल खेळाडूंचा आणि संघांचा फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूटचे (साई) अध्यक्ष सतीश सूर्यवंशी म्हणाले, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा फुटबॉल भूषण सन्मान सुरू करण्याचा उद्देश आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू या सर्वांसाठी पात्र असतील. जिल्ह्याबाहेरील एकाच खेळाडूला स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. तज्ज्ञ समितीकडून फुटबॉल भूषण सन्मानासाठी निवड होईल.
इतर महत्वाच्या बातम्या