एक्स्प्लोर

Kolhapur Football : कोल्हापुरात मेस्सी 'प्रेमी' कोम्यातून पुन्हा जोमात; मिरजकर तिकटीला झळकले भव्य 'कटआऊट'!

संपूर्ण कोल्हापूर शहरात फुटबाॅल प्रेमींकडून बॅनर आणि कटआऊट लागली आहेत. एकमेकांच्या ईर्ष्येवर ही पोस्टर्स आणि कटआऊट लावली जात आहेत. आता यादीमध्ये मिरजकर तिकटीच्या कटआऊटची भर पडली आहे.

Kolhapur Football : कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या सौदी अरेबियाने संभाव्य विजेते म्हणून पाहल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाविरोधात विजय मिळवल्यानंतर जगभरातील चाहते पूर्णत: कोमात गेले होते. मात्र, फिफा वर्ल्डकप 2022 मधील 'करो या मरो'च्या सामन्यात मेस्सीच्या अर्जेंटिनाने मॅक्सिकोवर विजय मिळवला. शनिवारी अर्जेंटिनाने मेक्सिकोचा 2-0 असा पराभव करून पुढील फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.  

लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि एन्झो फर्नांडिस (Enzo Fernandez) हे दोघे अर्जेंटिनाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनीही या सामन्यात प्रत्येकी एक-एक गोल केला. अर्जेंटिनाच्या या विजयामुळं ग्रुप-सीमधील राऊंड ऑफ 16 ची शर्यत आणखी रंजक ठरली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील पराभव विसरून मेस्सीने चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली. अर्थातच, त्याचे पडसाद फुटबाॅल पंढरी असलेल्या कोल्हापूरमध्येही उमटले. चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला. 

संपूर्ण कोल्हापूर शहरात फुटबाॅल प्रेमींकडून बॅनर आणि कटआऊट लागली आहेत. एकमेकांच्या ईर्ष्येवर ही पोस्टर्स आणि कटआऊट लावली जात आहेत. आता यादीमध्ये मिरजकर तिकटीच्या कटआऊटची भर पडली आहे. कोल्हापूर शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मिरजकर तिकटीला मेस्सी प्रेमींनी भव्य असे कटआऊट लावले आहे. बाजूला तुलनेत लहान कटआऊट नेमारचे लावण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही कटआऊटने चांगलेच लक्ष वेधले आहे. दुसरीकडे बिंदू चौकातही मेस्सी, नेमार, रोनाल्डो आणि सुनील छेत्रीचे कटआऊट आणि बॅनर चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत.  

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर फुटबाॅलमय झाले आहे. त्यामुळे आता आपल्या स्थानिक खेळाडूंना आणि संघाना पोत्साहान देण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. 

चार डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी (kolhapur Football) संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा गर्दी अन् जोश अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शाहू स्टेडियमवरही जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी 16 संघांची तयारी सुरु आहे. सीनियर सुपर 8 व सुपर 8 अशा दोन गटांतर्गत दररोज 2 असे एकूण 56 सामने होतील. चालू हंगामासाठी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे फुटबॉल महासंग्रामकडून कोल्हापूर फुटबॉलला शिस्त लागावी यासाठी फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केएसए लीग व सर्व स्पर्धा संपल्यानंतर फुटबॉल खेळाडूंचा आणि संघांचा फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. सॉकर

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget