एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठण गोपाळ अन् शाहू मिल कॉलनीत पाण्याची टाकी फुल्ल होऊन लोकांच्या घरात शिरले पाणी

शाहू मिल काॅलनी परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरून परिसर जलमय झाला, तरी मनपा प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. हजारो लिटर पाणी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वाया गेलं आहे.

Kolhapur News: कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा अक्षरश: ठणठणाट असल्याने पाणी नियोजनाचा मात्र बोजवारा उडाला आहे. आंधळं दळतय अन् कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था कोल्हापूर मनपा प्रशासनाची (Kolhapu Municipal Corporation) झाली आहे. कोल्हापूर शहरात (Kolhapur Water News) गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच शहरातील शाहू मिल कॉलनी परिसरात आज भलताच प्रसंग घडला. या परिसरातील पाण्याची टाकी फुल्ल होऊन थेट लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे फक्त संपूर्ण परिसर जलमय होऊन गेला. कोल्हापूर शहरामध्ये पाणीबाणी सुरू असताना अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय योग्य आहे का? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकांच्या घरात शिरले पाणी 

शाहू मिल काॅलनी परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरून परिसर जलमय झाला, तरी मनपा प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. हजारो लिटर पाणी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वाया गेलं आहे. शहराच्या पाणी उपसा करण्यावर विपरित परिणाम झाल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  

कोल्हापुरात दिवसाआड पाणी

कोल्हापूर शहरात सद्यस्थितीमध्ये दिवसाआड पाणी पुरवठा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा आणि भोगावती नदीने तळ गाठल्याने पुरेसा उपसा होत नसल्याने पाणी संकट ओढवले आहे. धरणांनी सुद्धा तळ गाठला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाण्याच्या काटकसरीची वेळ आली आहे. पाणी जपून वापरा असे सातत्याने आवाहन मनपा प्रशासनाकडून केलं जात असताना महापालिकेचा मात्र भोंगळ कारभार समोर आला आहे. 

शहरात 31 ठिकाणी टँकर्सने पाणीपुरवठा

दुसरीकडे, कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणी देऊनही अनेक भागात पुरेसा पुरवठा झाला नसल्याने विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांची टँकर्सची सुद्धा मागणी वाढू लागली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानतंर शहरात 25 ते 30 फेऱ्या होत होत्या. तोच आकडा आता 31 च्या घरात गेला आहे. उन्हाचा तडाखा त्यात लांबत चाललेला पाऊस यामुळे कोल्हापूर शहरात पाण्याची समस्या वाढत चालली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकारABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 25 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
Embed widget