(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: कोल्हापूरचे डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपुरात बदली, सांगलीचे अजित टिके कोल्हापुरात
कोल्हापूरचे (Kolhapur Police) डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची सांगलीमधील इस्लामपुरात बदली झाली असून सांगलीमधील (Sangli Police) एका अधिकाऱ्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.
Kolhapur News: राज्यातील 262 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करण्यात आलेल्यांमध्ये 143 पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली. दुसरीकडे डीवायएसपी रँकमधील 119 अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरचे (Kolhapur Police) डीवायएसपी मंगेश चव्हाण यांची सांगलीमधील इस्लामपुरात बदली झाली असून सांगलीमधील (Sangli Police) एका अधिकाऱ्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली आहे.
मंगेश चव्हाण यांची इस्लामपुरात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सांगलीमधील अजित टिके यांची कोल्हापूर शहर पोलिस दलात डीवायएसपीपदी बदली झाली आहे. नाशिक ग्रामीणमधील मनमाड उपविभागाचे समीरसिंग साळवे यांची कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये झाली आहे. सायबर क्राईममधील पीआय संजय गोर्ले यांची पदोन्नती झाली आहे. त्यांची राज्य गुन्हे अन्वेषणच्या कोल्हापूर सीआयडीमध्ये अप्पर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापुरात 650 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार
दुसरीकडे, कोल्हापुरात नियुक्त पोलिस ठाण्यात कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया होणार आहे. यामध्ये सुमारे 650 पोलिस कर्मचाऱ्यांचा बदल्या होणार आहेत. पोलिस ठाण्यात तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर कर्मचाऱ्याची अन्य पोलिस ठाण्यात बदली होते. कोरोना कालावधीमुळे या नियमित बदल्या थांबल्या गेल्या आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गृह विभागाने बदलीचे आदेश काढले होते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळा सुरु होत्या. शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश मिळणार नाही. ही बाब लक्षात घेऊन या बदल्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या. बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विनंती बदल्यांचा विचार केला जाणार आहे.
तत्पूर्वी, दोन महिन्यांपूर्वी, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील 11 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. काहींना कार्यमुक्तही करण्यात आले आहे. शहरातील चार पोलिस ठाण्यांना नवीन पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेलाही नवीन निरीक्षक मिळाल्यामुळे तेथील 11 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी भुदरगड, राधानगरी, गगनबावडा अशा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या