Kolhapur Coronavirus Update : तीन महिन्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात एका दिवसात पाच कोरोनाबाधित आढळले!
कोल्हापूर जिल्ह्यात तीन महिन्यांनी प्रथमच एकाच दिवसात पाच कोरोनाबाधित (kolhapur coronavirus update) आढळले आहेत. रविवारी कोल्हापूर शहरात तीन तर इचलकरंजीमधील दोन रुग्णांचा समावेश आहे.
Kolhapur Coronavirus Update : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात तीन महिन्यांनी प्रथमच एकाच दिवसात पाच कोरोनाबाधित (Kolhapur coronavirus update) आढळले आहेत. रविवारी (12 मार्च) कोल्हापूर शहरात तीन तर इचलकरंजीमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे, कोरोनासदृश लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणीची संख्या 40 वर पोहोचली आहे. आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये इचलकरंजीतील एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. दोघेही एकाच कुटुंबातील आहेत. तर कोल्हापूर शहरातील तीनपैकी दोन पुरुष असून, एक महिला आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून, औषधांबरोबर पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांकडून दिला आहे. यातील तिघेजण खासगी रुग्णालयात, तर दोघे शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.
महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सापडलेले रुग्ण इतर आजारात कोरोना चाचणी केल्यानंतर आढळले आहेत. ते कुठेही बाहेर जाऊन आलेले नाहीत किंवा त्यांना त्रास झालेला नाही. गेल्या आठवड्यात सापडलेले दोन रुग्ण बरे होत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापुरात विदारक परिस्थिती झाली होती. कोरोनामुळे अनेक घरे, कुटुंब उद्ध्वस्त झाली. जिल्ह्यात कोरोना महामारी आल्यापासून 2 लाख 21 हजार 770 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. बाधित रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला, तर 5 हजार 932 रुग्ण मृत्युमूखी पडले. शरीरामध्ये इतर व्याधी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तसेच कोरोना झाल्यानंतर मृत्यूच ओढवतो अशा अनामिक भीतीने सुद्धा अनेक या रोगाला बळी पडले आहेत.
मास्क (Mask) वापरण्याचं आवाहन
दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग वाढताना दिसत आहे. सध्या देशात सर्दी, ताप आणि खोकला या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा नवा व्हायरस असून ICMR ने हा विषाणू H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस असल्याची माहिती दिली आहे. सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब ही H3N2 इन्फ्लूएंझा संसर्गाची लक्षणे आहेत.
कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा विषाणू
सध्या कोरोना (Coronavirus) रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या विषाणूनं डोकं वर काढलं आहे. हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही बेजार झाली आहेत. औषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळताना दिसत नाही. हा व्हायरल संसर्ग H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होत आहे. H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू H1N1 इन्फ्लूएंझा विषाणूचा उपप्रकार म्हणजेच बदललेलं स्वरुप आहे.
इतर महत्वाच्या बातम्या