Kolhapur Airport : कोल्हापूर विमानतळावर आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी
कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Kolhapur Airport : चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा उद्रेक भारतामध्येही केंद्र सरकारने धास्ती घेतली आहे. त्यामुळे राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विमानतळावर (Kolhapur Airport) आजपासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोल्हापूर विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी आवश्यक त्या इतर सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळावर खबरदारी घेण्याबरोबरच देशांतर्गत विमानतळावरही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर देशभरातील सर्वच विमानतळांवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. नियमांचे पालन करण्याचे आवाहन कोल्हापूर विमानतळाचे (Kolhapur Airport) संचालक अनिल शिंदे यांनी केले आहे. कोरोनो प्रतिबंधात्मक नियमानुसार मास्क, सॅनिटायझर्सचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याची काय तयारी आहे याबाबत सरकारला प्रश्न विचारला होता.
कोरोना आणि गोवरसाठी 'पंचसूत्री'
दरम्यान, केंद्रीय स्तरावर काल बैठक झाल्यानंतर राज्य सरकारही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना आणि गोवर संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाची काल बैठक झाली, यामध्ये राज्यातील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला पंचसूत्री राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय इतर अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी राज्यात 7 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रत्येक आरटीपीसीआर चाचणीतून कोरोना बाधित नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोरोना नियम या पंचसूत्रीचा वापर करावा. तसेच प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेनं आरटीपीसाआर चाचण्या वाढवाव्यात, असं सांगण्यात आलं आहे. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट -व्हॅक्सिनेट आणि कोव्हीड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा, असे आदेश आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरवर आदेश देण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या