एक्स्प्लोर

Kolhapur Rain: कोल्हापुरात तीन दिवसात दुसऱ्यांदा विजांच्या गडगडाटासह धुवाँधार वळीव पावसाची हजेरी

Kolhapur Rain: कोल्हापुरात सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर झालेल्या पावसाने अक्षरश: धुमशान घातले. विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Kolhapur Rain: कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला तीन दिवसात दुसऱ्यांदा धुवाँधार वळीव पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. जवळपास तासभर झालेल्या पावसाने अक्षरश: धुमशान घातले. विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या तीन दिवसात आज दुसऱ्यांदा धुवाँधार पाऊस झाला. 

कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रचंड वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही क्षणामध्ये मंदावली गेली. तीन दिवसांमध्ये दोनवेळा झालेल्या दमदार वळीव पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नद्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह उभी पीकेही संकटात आली होती. कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही गेल्या अनेक दिवसांपासून विपरित परिणाम झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भोगावती आणि पंचगंगा नदीने तळ गाठला आहे. 

या पार्श्वभूमीवर जोरदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाणी नियोजनासाठी उपसा बंदी करण्यात आल्याने नदीकाठची पिके पूर्णत: धोक्यात आली होती. मात्र, दमदार वळीव पावसाने उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे. विशेष करून या वळीव पावसाचा मोठा लाभ होणार आहे. भाजीपाल्याला सुद्धा चांगलाच लाभ होणार आहे. 24 मेपासून रोहिणी नक्षत्र सुरु होत आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतींना सुद्धा वेग आला आहे. तत्पूर्वी, दमदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. 

दुसरीकडे, कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, वळीव पावसाचा जोर असाच राहिल्यास या कामावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामाची बुधवारी आमदार सतेज पाटील यांनी पाहणी केली आहे. पाटील यांनी कामाच्या ठिकाणी  भेट देत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच कामाची सद्यस्थिती याची माहिती घेत काम शक्य तितक्या वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
गोकुळसाठी सतेज पाटलांची थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरात बैठक; कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी?
सोयाबीन ते सूर्यफूल! महाराष्ट्रात दिवसाला किती लिटर खाद्य तेल लागतं? कोणत्या तेलाचं किती प्रमाण? 
सोयाबीन ते सूर्यफूल! महाराष्ट्रात दिवसाला किती लिटर खाद्य तेल लागतं? कोणत्या तेलाचं किती प्रमाण? 
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं
Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
वा रे प्रशासन! आदित्य ठाकरेंची पाहणी, बैठक संपून माघारी येण्यापूर्वीच लोटे एमआयडीसीतील खड्डा बुजवला
Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, सुनेत्रा पवारांचे निर्देश
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
कामाचं बिल निघेना, अधिकारी पैसे मागतात? नांदेडच्या ठेकेदाराचं मुंबईत टोकाचं पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
पेपरफुटीनंतर आता बोगस गुणपत्रिका रॅकेटचा पर्दाफाश; चंद्रपुरात एकास अटक, अलिशान गाड्या मार्कलिस्ट जप्त
Tukaram Mundhe : गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
गणेशोत्सवात मंडळांना महाप्रसादासाठी नवा नियम आहे? तुकाराम मुंढे म्हणाले...
YouTube Earning Tax : यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर भारतात किती कर लागतो?  जीएसटी भरावा लागतो का?
Embed widget