Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Hasan Mushrif on Satej Patil : अमित शाह आणि फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक नंबरवर राहील, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली होती.
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचा कोल्हापूरमध्ये मेळावा पार पडल्यानंतर नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी चार्ज करण्याचे आवाहन केले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपण ठरवलं तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील 70 टक्के जागा जिंकू शकतो, असा दावा केला. अमित शाह आणि फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी एक नंबरवर राहील, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली होती. यानंतर आता वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार पलटवार केला.
सतेज पाटलांचा निवडणुकीनंतर भ्रमनिरास होईल
हसन मुश्रीफ म्हणाले की, सतेज पाटलांचा निवडणुकीनंतर भ्रमनिरास होईल. त्यांना मंत्रिपद मिळाला नसल्याचे दुःख असल्याचे खोचक टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 47 जागांवर महायुतीला यश मिळेल. दरम्यान, जागावाटपावर बोलताना त्यांनी फारसा वाद राहिला नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की महायुतीमधील तिन्ही नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली असल्याचे म्हणाले. जे इच्छुक आहेत ते कामाला लागले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल
त्यांनी पुढे सांगितले की, राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. आपण जेव्हा महायुतीमध्ये लढतो त्यावेळी सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचं असतं. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी एकत्रित काम केले पाहिजे. एकमेकांच्या जागा पाहून काम पूर्ण होणार नाही, तर एकमेकांच्या जागा निवडून आणणे गरजेचं आहे.
दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये आमची मते मिळाली ते फडणवीस कोणत्या आधारे बोलले ते मला माहित नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष जोरदार कामगिरी करतील.
मी अग्निपरीक्षा सुद्धा दिली आणि गुरुदक्षिण देखील दिली आहे
यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा समरजित घाटगे यांच्यावर टोफ डागली. ते म्हणाले की मी 35 ते 40 वर्ष शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी झालो. त्यामुळे मी अग्निपरीक्षा सुद्धा दिली आहे आणि गुरुदक्षिण देखील दिली आहे. त्यामुळे सुप्रियाताई सुळे यांनी समजून घेणे गरजेचं आहे. त्यामुळे व्यक्तीला समोर करून असं बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये सावध म्हणजे विरोधक असतात ते सावज माझ्या टप्प्यात आलं असल्याचे सांगत त्यांनी समरजित यांच्यावर तोफ डागली.
इतर महत्वाच्या बातम्या