Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील मानेंच्या गावामध्ये नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ; प्रकरण नेमकं काय?
रेल्वे प्रवाशांनी (Railway) रुळावर चालून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी (Kolhapur Police) आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने रेल्वे प्रवासी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
रुकडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे (Hatkanangle Lok Sabha constituency) खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी (Rukdi) गावच्या लोकांना आत्मक्लेष आंदोलन करण्याची वेळ बुधवारी आली. प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी गावात बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी रेल्वे प्रवाशांनी (Railway) रुळावर चालून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी (Kolhapur Police) आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने रेल्वे प्रवासी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आला. बंद, आत्मक्लेश आंदोलन धैर्यशील मानेंच्या गावामध्येच करण्यात आल्याने चर्चेचा विषय झाला.
याप्रकरणी अमितकुमार भोसले (वय 44) प्रसाद गवळी (वय 48, दोघे रा. रूकडी) कुमार चव्हाण (वय 45 रा. इचलकरंजी) या तिघांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या तिघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती रेल्वे पोलिस निरिक्षक विजयकुमार मांझी यांनी दिली. विभागीय रेल्वे प्रबंधक दुबे यांनी मंगळवारी कोल्हापूर पुणे मार्गाची पाहणी केली होती. यावेळी रेल्वे प्रवाशांनी विविध मागण्या केल्या होत्या.
गलथान कारभारामुळे खासदारांच्या गावाला मनस्ताप
रुकडीमधील एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्यात आल्याने कोल्हापूरमध्ये शिक्षण, नोकरी तसेच व्यवसायासाठी येणाऱ्या विद्यार्थी, प्रवासी नागरिकांची चांगलीच कुचंबणा होत आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वात कोल्हापूर रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यावर आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचे निवेदन दिले होते.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रूकडी ग्रामस्थांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकात आंदोलन केले. आधीपासूनच मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी जमू लागलेल्या आंदोलकांना बाजूला काढले. यामुळे प्रवासी, नागरिक घाबरले. पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे भूयारी मार्गाजवळ ताब्यात घेताना वादावादी झाली.
इतर महत्वाच्या बातम्या