(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bidri Sakhar Karkhana : बिद्रीचे चेअरमन केपी पाटील थेट मुंबईत अजित पवारांच्या भेटीला; प्रकाश आबिटकरांवर केला आरोप
बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परवाना सुद्धा जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परवाना सुद्धा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि के. पी. पाटील यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.
कारवाईमागे प्रकाश आबिटकरांचा हात
दरम्यान, या कारवायांमागे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर असल्याचा असल्याचा आरोप के. पी. पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. दुसरीकडे, जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात सर्वाधिक ऊसाला दर देणारा कारखाना म्हणून बिद्री सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांचा कारभार लय भारी अशीच म्हण प्रचलित आहे.
आता याच कारखान्यात डिस्टिलरी प्रकल्पातील अनिमियतेवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच बिद्री कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते महाविकास आघाडीच्या वाटेवर चर्चा रंगली होती. त्यामुळे याच कारणातून ही कारवाई झालेली नाही ना? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
दरम्यान, के पी पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. पाटील महाविकास आघाडी सोबत जाणार अशी चर्चा सुरू असतानाच कारखान्यावर धाडी पडल्या होत्या. शक्तिपीठ महामार्ग विरोधात मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी सरकारवर टीका केली होती. शाहू महाराज माझ्या गावी आले होते. त्यावेळी मी त्यांचे स्वागत केले. मी शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहिलो हा माझा काही गुन्हा आहे का? अशी विचारणा पाटील यांनी धाडीनंतर केली होती.
आमच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नेहमी कारखाना बदनाम करणाऱ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. कारखान्याची तपासणी 10 वेळा करा, काही अडचण नाही, पण तपासणी रात्रीची केली याचं वाईट वाटत असल्याचं पाटील म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या