Gram Panchayat Election in Kolhapur District : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु, मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर
Kolhapur Grampanchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
Gram Panchayat Election in Kolhapur District : कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 31 मे 2022 पर्यंत अस्तित्वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 21 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीस पात्र असणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होताच गावागावांत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे फलकबाजी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक महिनाभरात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबर महिन्यात 429, तर डिसेंबर महिन्यामध्ये 45 ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे.
मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना, मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन निवडणूक आयोग करत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतींच्या जशा मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करावी, असे निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
दुसरीकडे टप्प्याटप्प्याने प्रशासक नियुक्ती मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन आदी विभागांतील विस्तार अधिकारी तसेच समकक्ष अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. मात्र, ग्रामसेवकांकडे प्रशासकपदाची जबाबदारी दिली जाणार नाही. या सर्व प्रशासकांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण करणार आहेत.
शासनाने लागू केलेले निर्बंध व सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका यामुळे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये राज्यातील 7,675 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
शासनाने लागू केलेले निर्बंध व सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका यामुळे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या आहेत. आता राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये राज्यातील 7,675 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
येत्या तीन महिन्यात मुदत संपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती
- करवीर 53
- कागल 26
- पन्हाळा 50
- शाहूवाडी 49
- हातकणंगले 39
- शिरोळ 17
- राधानगरी 66
- गगनबावडा 21
- गडहिंग्लज34
- आजरा 36
- भुदरगड 44
- चंदगड 40
इतर महत्वाच्या बातम्या