(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray in Kolhapur : कोल्हापुरात आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी 40 फुटी महाकाय हार सज्ज, शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी हार घालणार
Aaditya Thackeray in Kolhapur : कोल्हापूर शहरात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी महाकाय 40 फुटी हार सज्ज ठेवण्यात आला आहे.
Aaditya Thackeray in Kolhapur : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर युवानसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बंडखोराच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. त्यांची आज शिवसंवाद यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली आहे. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचे आज आजरा तालुक्यात जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदारांवर चांगलाच हल्ला चढवला.
आदित्य ठाकरे आजऱ्यातील स्वागतानंतर कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. कोल्हापूर शहरात स्वागतासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी महाकाय हार सज्ज ठेवण्यात आला आहे. तब्बल 40 फुटी हार असून शिवसेना संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी तो आदित्य यांना घालण्यात येणार आहे. शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी यासाठी नियोजन केलं आहे.
आबिटकरांना मतदारसंघात उद्धव साहेबांनी 567 कोटी दिले
जल्लोषी स्वागतानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे बंडखोर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर हल्ला चढवला.ते आपल्या जवळचे होते,अगदी उद्धव ठाकरे यांच्याही जवळचे होते.डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवला.आबिटकारांना या मतदारसंघात उद्धव साहेबांनी 567 कोटी देऊ केले आहेत.इतका निधी मिळाल्यानंतरही या आमदाराने असं वागावं? अशी विचारणा त्यांनी केली.
त्यामुळे आबिटकरांनी अजूनही बंडखोरी केली आहेय असे मला वाटत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.ते पुढे म्हणाले की,या बंडखोरांमध्ये दोन गट आहेत.त्यामधील एक गट असा आहे ज्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. त्यांची अजूनही भूक भागलेली नाही. त्यांना अजूनही खायचं आहे.दुसरा गट असा आहे ज्यांना फसवून नेलं आहे.माझ्या मनात यांच्याबद्दल द्वेष नाही, ज्यांना सर्व काही दिलं. राजकीय ओळख मिळवून दिली,अशा माणसांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जात होता. जातीय दंगली होत नव्हत्या. साहे सहा लाखांची गुंतवणूक आपण आणू शकलो होतो. दोन वर्ष उद्धव ठाकरे टाॅप 5 मुख्यमंत्र्यांमध्ये होते.
आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या खासदारांवरही हल्ला चढवताना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या