Raju Shetti on ZP Election : स्वाभिमानी शेतकरी संघटना झेडपी निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरणार
Raju Shetti on ZP Election : स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी युतीचे राजकारण टाळून भविष्यातील निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Raju Shetti on ZP Election : स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी युतीचे राजकारण टाळून भविष्यातील निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कटू अनुभवानंतर आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या एकूणच अधोगतीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्टी यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक काल कराडमध्ये पार पडली. यावेळी बोलताना शेट्टी यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी तयार राहण्याचे आदेश त्यांनी दिले. ते स्वत: 31 आॅगस्टपासून दौरे करणार करणार आहेत. झेडपी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत, अशी मागणी केली.
शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीचा भाग होता आणि त्याचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार आघाडीसोबत राहिले.मात्र, भुयार यांना त्यांच्या पक्षविरोधी कारवायांमुळे संघटनेतून काढून टाकण्यात आलं आहे.
स्वाभिमानी पक्षाचे राज्याच्या विविध भागांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रतिनिधित्व आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून शेट्टी 2019 च्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी,शेतकरी संघटनेचा ऊस पट्ट्यात आणि राज्याच्या इतर काही भागांमध्ये प्रभाव आहे.
सर्व पक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना शेट्टी म्हणाले की, राज्यातील राजकारणाची पातळी लक्षणीयरीत्या खालावली आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाशी संबंध ठेवणे त्यांच्यासाठी शक्य नाही. “राज्यातील अलीकडच्या घडामोडींनी हे सिद्ध केले आहे की राजकीय पक्षांनी सर्व विचारधारेला फाटा दिला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संघटना म्हणून अशा वातावरणाचा भाग बनणे आम्हाला शक्य होणार नाही.
यापुढे संघटना स्थानिक, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी पुढे म्हणाले की, राजकारण पैसा आणि मसल पॉवरला समानार्थी बनत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या छोट्या संघटनेला निवडणूक लढवण्यासाठी सदस्यांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर अवलंबून राहावे लागेल. “आमच्या स्थापनेपासून, आम्ही आमच्या सदस्यांच्या देणग्यांवर अवलंबून आहोत आणि आम्ही ते करत राहू. अलीकडेच शेतकऱ्यांनी वर्गणी काढून 42 लाख रुपयांची एसयूव्ही खरेदी करून राजू शेट्टी यांना भेट दिली होती. त्यामुळे मला आर्थिक बाबींची फारशी चिंता वाटत नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आता 25 जणांचे होणार
- Kolhapur : एनआयएने सख्ख्या भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि सहा तासाने सोडले, पण कारण नसताना कुटुंबाची मानसिक नासधूस झाली त्याचे काय?
- Kolhapur Rain update : कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाच्या झळा, पावसाचे आगार असणाऱ्या गगनबावडा, राधानगरी तालुक्यातही पावसाची पाठ