एक्स्प्लोर

मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार : मंत्री जितेंद्र आव्हाड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार असल्याची घोषणा आज मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्याचसोबत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं घर देखील स्मारक बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबई : मुंबईतील बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारपरिषदेत याबाबतची घोषणा केली. परळमधल्या बीआयटी चाळ क्रमांक एकमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातला 22 वर्षांचा कालखंड घालवला होता. या वास्तूमधील दोन खोल्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि त्यांचे कुटुंबीय राहत होते. बाबासाहेबांच हेच घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. चाळ क्रमांक एकमध्ये बाबासाहेबांचं स्मारक होणार असल्यानं तिथल्या रहिवाशांसाठी शेजारीच सरकारकडून नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे. यावेळी आव्हाड म्हणाले की, 30 जून 2019 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे अशी मागणी केली होती. अण्णाभाऊंनी अजरामर साहित्य लिहिले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफ वाजून महाराष्ट्र पेटवला नवचैतन्य निर्माण केलं. मंत्री होताच भव्य स्मारक उभारण्याचं निर्णय घेतला, असं ते म्हणाले.  तसेच  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं परळ येथील घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. हे काम सुरु करण्याचा निर्णय आज घेतला, असेही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, म्हाडाने निर्णय घेतला 45 दिवसाच्या आत फाईल क्लिअर करायची असाच निर्णय एसआरए बाबत होणार आहे. बिल्डरला आजच्या घडीला मदत केली पाहिजे. बिल्डरने बिल्डिंग बांधली तर गरिबांना घर मिळतील. कायद्याने जे अधिकार दिले आहेत त्याचं पालन त्यांनीही केलं पाहिजे. काही लोकांमुळे एसआरए योजना अडकू नये यासाठी प्राधान्य राहील, असेही आव्हाड म्हणाले. त्यांनी सांगितलं की, म्हाडाकडे जमिनी आहेत काही प्रकल्प आणता येत का, एफडीए आणता येतील का यावर देखील विचार केला जात आहे. मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे. घरांच्या किमती वाढत गेल्या आहेत. म्हाडाचं घर स्वस्तात पडतं. हाऊसिंग स्टॉक वाढवून घर देता आली पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. माहुलवासियांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. यासाठी सरकारशी चर्चा करू. मी परत एकदा मुख्यमंत्र्यांना यासाठी बोलणार आहे, असे ते म्हणाले. संबंधित बातमी  इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार  14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार  बाबासाहेबांनी 22 वर्ष वास्तव्य केलेल्या परेलमधल्या चाळीत अनुयायांचा ओढा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Hema Malini On CJP Protest: 'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींनी CJP च्या आंदोलनाला म्हटलं निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
'आंदोलनाचा काहीच फायदा नाही, मोदी सरकारनं खूप काम केलंय...'; हेमा मालिनींच्या मते CJP प्रोटेस्ट निरर्थक, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर मात्र...
Garud Puran: फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
फ्रिजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय? अंघोळ न करता स्वयंपाक? गरूडपुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल, वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक...
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Embed widget