एक्स्प्लोर

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं

अकोला जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील निंबी मालोकार येथे दोन सख्या चुलतभावामध्ये झालेला वाद जीवघेणा ठरला आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.

Akola Crime News : अकोला (Akola) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बाळापूर पोलीस स्टेशन (Balapur Police Station) हद्दीतील निंबी मालोकार येथे दोन सख्या चुलतभावामध्ये झालेला वाद जीवघेणा ठरला आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. अमोल मालोकार असं मृतक व्यक्तीचे नाव आहे. तर अजय मालोकार असं आरोपीचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

शेतीच्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केली. एक नव्हे तर 3 ते 4 गोळ्या झाडून युवकाला जागीच ठार केलं आहे. अमोल गजानन मालोकार असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, मृत अमोल मालोकार याच्याचं दूरच्या चुलत भावानेचं गोळ्या झाडून हत्या केल्याचं बोलल्या जाते. अकोला शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या 'नींबी  मालोकार' गावात ही घटना घडली. आज सायंकाळच्या सुमारास निंबी मालोकार शेतशिवारात अमोलच्या कानामध्ये आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मात्र, शेतकरी कुटुंबात संपत्तीचा वाद थेट जीवावर बेतल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृत अमोल गजानन मालोकार याची हत्या त्याच्याचं चुलत भाऊ अजय नामक व्यक्तीने केल्याचे बोलले जाते. अजय याच्यावर सध्या पोलिसांना संशय आहे, घटना घडल्यापासून तो फरार आहे. घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी निंबी मालोकार गावात दाखल झाले आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलिसांकडून चार पथक गठीत करण्यात आले. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असं आश्वासन अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना दिलंय. दरम्यान, या प्रकरणात बाळापुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान अजय नामक व्यक्तीने अमोलच्या कानात आणि इतर ठिकाणी गोळ्या झाडून त्याला कायमचं संपवलं आहे.

या घटनेनं अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली

अजय मालोकार (Ajay Malokar) हा दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मोठा भाऊ आहे. दोन वर्षांपूर्वी जय मालोकारचा अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर हृदयविकाराने मृत्यू  झाला होता. कौटुंबिक वादातून हत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळं अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

ठाण्यात सॅटीस-2 प्रकल्पाच्या बेसमेंटमध्ये आढळला सुरक्षारक्षकाचा मृतदेह

ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील सॅटीस-2 प्रकल्पाच्या बेसमेंटमध्ये आज अशोक साळुंखे (60) या कंत्राटी सुरक्षारक्षकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. रात्री मद्यपींचा वावर असतो. त्यांच्याशी झालेल्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. कोपरी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

नांदेडच्या दूध डेरी परिसरात युवकाला संपवलं, पाच जणांना अटक

नांदेडच्या दूध डेरी परिसरात धक्कादायक घटना घडली होती. खंजिराने वार करत एक युवकाची हत्या करण्यात आली होती. इंदरसिंग बावरी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव होते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून जात असताना 5 जणांच्या टोळक्याने त्याला मारले होते. त्यानंतर खंजिराने भोसकण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी जात तपासाचे चक्र फिरवली होती. नांदेड ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तपासणी करत असताना कुख्यात गुंड कैलास बिगानिया यांच्या टोळीने ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी आज 5 जणांना ताब्यात घेतले आहे. कृष्णा बारुळे ज्योती बिगानिया दिलीप डाकोरे सूर्यवंशी व अन्य 1 एक अशी ताब्यात घेतलेल्याची नाव आहे नेमकी हत्या का झाली कसा साठी याचा तपासात पोलिस करत आहे.

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
Advertisement

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
Embed widget