सरकारी शिष्टमंडळाचं विमान संभाजीनगरमध्ये लँड, भुजबळ-मुंडेंसह 12 जणांची टीम लक्ष्मण हाकेंची मनधरणी करणार
भुजबळ यांच्या समवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत नेते आणि अधिकारी येणार आहेत.
जालना : ओबीसी उपोषणकर्त्यांना (OBC Reservation) आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे. थोड्याच वेळात सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल होईल यानंतर शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake) भेटीला वडीगोद्रीकडे रवाना होणार आहे.. सरकारच्या शिष्टमंडळात सहा वरिष्ठ मंत्र्यांसह आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा समावेश आहे. शिष्टमंडळ आधी वडीगोद्री इथे जाऊन आंदोलकांशी चर्चा करेल. त्यानंतर शिष्टमंडळ पुण्यात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणेंची भेट घेईल. मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आज आंदोलनाच्या 10 व्या दिवशी हाके आणि वाघमारे उपोषण मागे घेतात का याची उत्सुकता आहे.
भुजबळ यांच्या समवेत 12 जण लक्ष्मण हाके यांच्या भेटीला येणार आहे. लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत नेते आणि अधिकारी येणार आहेत.
कोण कोण जाणार लक्ष्मण हाकेंच्या भेटीला?
- मंत्री छगन भुजबळ
- मंत्री उदय सामंत
- मंत्री गिरीश महाजन
- मंत्री अतुल सावे
- मंत्री धनंजय मुंडे
- गोपीचंद पडळकर
- समीर भुजबळ
- प्रकाश शेंडगे
- शब्बीर अन्सारी
- संतोष गायकवाड
- प्रशांत जोशी
- अजय पाटणे
मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. छगन भुजबळ यांच्यासह सहा मंत्री या शिष्टमंडळात असतील. प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे गेल्या 10 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे. आम्हाला आरक्षण संविधानाने दिलेले आहे. मराठा आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे, पण त्यांना आमच्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणी या ओबीसी आंदोलकांनी केली.
राजेश टोपेंची तडकाफडकी भेट
जालना उपोषणाच्या 10व्या दिवशी राजेश टोपे यांची ओबीसी आंदोलनाला तडकाफडकी भेट ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन विचारपूस केली. अवघी पाच मिनिटे या व्यासपीठावर थांबले सरकारने सामंजस्याने तोडगा काढावा असे सांगत असताना पत्रकारांनी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी असताना उपोषण स्थळाला याला एवढा उशीर का झाला असावा केला असता आपण सेक्युलर विचाराचे असल्याचे उत्तर राजेश टोपे यांनी यावेळी दिले.
हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंडण आंदोलन
जालना जिल्हात सुरू असलेल्या ओबीसी समाज बांधव लक्ष्मण हाके यांच्या उपोषणला पाठींबा देण्यासाठी गेली तीन दिवसापासून खिळद येथे ओबीसी समाज बांधव शहादेव गर्जे व अंकुश महाजन यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी मुंडण आंदोलन करण्यात आले. मुंडण करून सरकारचा निषेध व्यक्त केल्यानंतर यावेळी आंदोलन करतनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा देत लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
Video :
हे ही वाचा :