एक्स्प्लोर

जालन्यातील जीडीसीसी प्रकरणात प्रमोटर किरण खरात अखेर पोलिसांना शरण; 10 मेपर्यंत पोलिस कोठडी

Jalna News : शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना किरण खरात शरण गेला आहे.

Jalna News : मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या जालन्यातील क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) प्रकरणातील मुख्य संशयित प्रमोटर किरण खरात अखेर पोलिसांना शरण आला आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना किरण खरात शरण गेला आहे. तर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास 10 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

जालन्यातील जीडीसीसी प्रकरणात प्रमोटर किरण खरात, एक महिला व अन्य एक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या अधिक असल्याने तसेच गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेत तपास जिल्हा आर्थिक शाखेकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील चार संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे. तर त्यांच्याकडून चार कोटी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. 

मात्र मुख्य प्रमोटर किरण खरात मात्र फरार होता.  जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेत अटकपूर्ण जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान खंडपीठाने या प्रकरणातील महिला असलेल्या संशयित आरोपीस मागील आठवड्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तर किरण खरात यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 6 मे रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत शरण जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार किरण खरात हा पोलिसांना शरण आला आहे. 

काय आहे प्रकरण? 

जीडीसी या अभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून जीडीसी कंपनीचा प्रमोटर म्हणून वावरणाऱ्या किरण खरात यांच्या सांगण्यावरून जालना जिल्ह्यातील हजारों लोकांनी पैसे गुंतवविले होते. हा जीडीसी कॉइन 25 डिसेंबर 2022 रोजी खुल्या बाजारात येणार असल्याचे खरात याने गुंतवणूदारांना सांगितले होते. मात्र सांगितलेल्या दिवशी जीडीसी कॉइन लाँच झाला नाही. त्यामुळे जीडीसी कॉइनचे दर कोसळले. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांच्या आशेवर पाणी फेरले गेले. तर याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणात माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जावयाचे नाव आल्याने, हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यात गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. 

संबंधित बातम्या: 

Jalna News: जालन्यातील 'क्रिप्टो' घोटाळ्याप्रकरणी आठ संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Embed widget