एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Chhagan Bhujbal : अंतरवाली सराटीजवळून छगन भुजबळांचा एल्गार; 17 तारखेला अंबडमध्ये महामोर्चा

Chhagan Bhujbal : 17 तारखेला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा आवाहन भुजबळ यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जातांना त्यांचे अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, यावेळी बोलतांना भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच, 17 तारखेला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा देखील त्यांनी आवाहन केले आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जाताना मंडल स्तंभाला अभिवादन करताना अंतरवाली सराटी फाट्यावर भुजबळ यांनी भाषण केले. यावेळी बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर, भुजबळांनी जामखेड फाटा येथे स्वागत स्वीकारताना बांधवांना मोर्चे आणि आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दहशत माजवून जे मिळेल ते पदरात पाडून घेण्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटलय. सोबतच, 17 तारखेला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर, कोणत्याही आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा देखील त्यांनी म्हटले. 

मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार 

दरम्यान याचवेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल. समोरच्या दरवाज्यातून एन्ट्री मिळत नाही, म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असे भुजबळ म्हणाले. 

जरांगे यांचे प्रत्युत्तर...

छगन भुजबळ यांच्या संभाषणाची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात, "आपण आता करेंगे या मरेंगे हेच करायला पाहिजे आणि आवाज द्यायला पाहिजे, असे म्हणत असल्याचा डाव केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. "करेंगे या मरेंगे असे म्हणणे त्यांचा प्रश्न आहे. पण आमचं म्हणणे आहे की, 'लड़ेंगे भी और जीतेंगे भी' असे जरांगे म्हणाले. तर, आम्हाला अजून आरक्षण मिळालेच नाही, अजून लढा सुरु आहे. आम्ही आमच्या हक्काचे मागत असून, कोणावर अतिक्रमण करत नाही. कोण काय बोलत आहे, त्याकडे आता लक्ष न देण्याचे आम्ही ठरवले असल्याचे जरांगे म्हणाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

 आता दहशत माजवावीच लागेल, सरसकट मराठा प्रमाणपत्राला छगन भुजबळांचा थेट विरोध

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 29 November 2024  दुपारी २ च्या हेडलाईन्सTop 25  Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 29 NOV 2024 : 1 PmABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 29 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सBaba Adhav Pune Protest : विधानसभा निवडणुकीत पैशांचा मोठ्याप्रमाणात वापर, आढाव यांचा आरोप; पुण्यात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Punjab Kings IPL 2025 : वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
वडिलांनी ज्याला 500 रुपयांसाठी फटकारले त्यालाच आयपीएल लिलावात 80 लाखांची बोली! वडिलांचा अजूनही सलूनचा व्यवसाय
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Video : कदाचित चित्त्याची झेप सुद्धा फिकी पडली असेल; क्रिकेटच्या इतिहासात असा कॅच होणे नाही!
Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच 'सेकंड-हँड, यूज्ड' चा शिक्का मारला; समंथा रुथ प्रभू मन मोकळं करत म्हणाली, हे वेदनादायी पण...
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
मुख्यमंत्रीपद भुषवल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद नकोसं, पण भाजपला एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये असण्याची इतकी गरज का?
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी, सलग दुसऱ्या दिवशी दरात झाली वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे? 
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Embed widget