(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जळगावात चार गावठी कट्ट्यासह 10 जिवंत काडतूस हस्तगत, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव जिल्ह्यात गावठी कट्ट्यांची तस्करी या कारवाईनंतर पुन्हा चर्चेत आली .चार गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
जळगाव :चार गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस बाळगणार्या श्रीरामपूरातील दोन अट्टल गुन्हेगारांच्या जळगाव (Jalgaon News) गुन्हे शाखेने चोपडा शहरातून मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, संशयीतांचा एक साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात गावठी कट्ट्यांची तस्करी या कारवाईनंतर पुन्हा चर्चेत आली .
पथकाने राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (32, रा. खंडाळा, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), गणेश ज्ञानेश्वर सातपुते (23, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांना अटक (Arrested) केली. तर अंधाराचा फायदा घेत बबन उर्फ रोहित जाधव (रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर, जि.अहमदनर) पसार झाला.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना काही संशयीत चोपडा येथे गावठी कट्टा खरेदीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने रविवारी (13 नोव्हेंबर) रात्री बाराच्या सुमारास शिवाजी चौकात सापळा रचला. रस्त्यावर संशयीताच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यातून चार गावठी पिस्टल व 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
ऑगस्ट महिन्यात चोपडा (Chopda) शहरात तब्बल 12 गावठी कट्टे मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती.गावठी कट्ट्यांसह हरियाणाच्या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. सापळा रचून शिताफीने अटक केली होती. आरोपींजवळ तब्बल 12 गावठी बनावटीचे कट्टे, पाच जिंवत काडतूस व तीन मोबाईल फोन असा एकूण 77 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होती. त्यानंतर आता पुन्हा ही मोठी कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड येथून तीन पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त
इस्लामपूर (Islampur) पोलीस दलातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तीन पिस्तुलांसह चार जिवंत काडतुसे जप्त करत दोघांना ताब्यात घेतलेय. वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड गावच्या हद्दीतील खिंडीत सातारा (Satara) आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करत ही कारवाई करण्यात आलीय. दुचाकीसह देशी बनावटीची पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा दोन लाख दोन हजार रुपयांच्या हत्यारांचा साठा जप्त केला. ही प्राणघातक हत्यारे त्यांनी कोठून आणि कोणाकडून आणली, याची कसून चौकशी दोघांकडे करण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
एकनाथ खडसेंना धक्का, जळगाव दूध संघ अपहारप्रकरणी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक