CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, 50 किलोमीटरसाठी निवडला हवाई मार्ग, नेमका कारण काय?
Nashik News : शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या दौऱ्यांनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जळगाव दौऱ्यावर आहेत.
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्हा राजकीय सभांचे हॉटस्पॉट बनत असून शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या दौऱ्यांनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील जळगाव दौऱ्यावर असून आज पाचोरा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री हे मुंबईहून जळगावला हेलिकॉप्टरने येतील. त्यानंतर 50 किलोमीटरसाठी पुन्हा हेलिकॉप्टरने पाचोरा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असा दौरा असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय सभांना जोर चढला आहे, त्यात जळगाव जिल्हा (Jalgaon District) चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यात जाहीर सभा घेत राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील जळगाव जिल्ह्यात सभा घेत पक्ष बांधणीची मशाल पेटवली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून पाचोरा तालुक्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत आहे. यासाठी ते मुंबईहून जळगावला शासकीय विमानाने त्यानंतर जळगाव येथून शासन आपल्या दारी कार्यक्रम स्थळ असलेल्या व जळगावहून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचोरा येथे रस्ता मार्गाने न जाता आता हेलिकॉप्टरने जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत हे 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मंगळवारी जळगाव जिल्ह्यात येत असून, ते जळगाव येथून हेलिकॉप्टरने पाचोरा आणि तेथून पाळधीला जाणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर ते मुंबईसाठी रवाना होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत विमानाने दुपारी 12.00 वाजता जळगावला येतील. विमानतळावरून हेलिकॉप्टरने पाचोऱ्याकडे रवाना होतील. 12.15 वाजता हडसन (पाचोरा) येथे पोहोचतील. दुपारी 12.30 वाजता त्यांच्या उपस्थितीत एम. एम. कॉलेजच्या मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे. दुपारी 2.30 वाजता भडगाव तालुक्यातील एका खासगी कंपनीचे उद्घाटन व पाचोरा येथे 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन मुख्य इमारती बांधकामाचे ई-भूमिपूजन केले जाणार आहे. 3.45 वाजता मुख्यमंत्री व उद्योगमंत्री हडसन येथून हेलिकॉप्टरने पाळधीला रवाना होतील. 4.20 वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देतील. सायंकाळी 5 वाजता पाळधी येथून हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे प्रयाण करतील. 5.20 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.
रस्त्याने जाण्यापेक्षा हवाई मार्ग ...
राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले असून, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. संभाव्य दौऱ्यानुसार, ते विमानाने जळगावला येतील आणि येथून हेलिकॉप्टरने पाचोऱ्याकडे रवाना होतील. त्यांनी 50 किमी अंतरासाठी हवाई मार्ग निवडला आहे. त्याची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे. तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे. कोणतीही रिस्क नको म्हणून विमानतळावरून ते थेट पाचोर्यात जातील, रस्त्याने गेले असेल तर त्यांना अर्धा तास लागला असता पण संपूर्ण मार्गावर बंदोबस्त ठेवण्याची कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सतर्क राहण्याचे मोठे काम पोलिसांना लागले असते, हवाई मार्ग म्हटला म्हणजे हा ताण हलका होणार आहे, अशी चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू झाली आहे, मात्र पाचोराचे शिंदे गटाचे आमदार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किशोर पाटील यांनी या दौऱ्यात जळगाव ते पाचोरा हा रस्ता मार्ग टाळण्यामागील चर्चा फेटाळून लावले आहे.
इतर महत्वाची बातमी :