एक्स्प्लोर
CM Eknath Shinde Jalgaon : शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचोऱ्यात
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा झाला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते ठाकरेंवर पलटवार करणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री जळगाव विमानतळावर पोहचतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते पाचोरा तालुक्यातील हडसन शिवारातील हेलिपॅडवर येतील. आणि तेथून मोटारीने पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयाच्या मैदानावरील शासन आपल्या दारी कार्यक्रमास सहभागी होतील
आणखी पाहा


















