Jalgaon News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावरून सोशल मीडियातून टीकेची झोड; कसं आहे बोधचिन्ह?
Amalner Sahitya Sammelan : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावरून टीका केली जात आहे.
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावरून टीका होत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त (Mahatma Gandhi) या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. मात्र, या अनावरनानंतर या बोधचिन्हावर टीका सुरू झाल्या आहेत. संमेलनाचे बोधचिन्ह तेच तेच का? यात बदल कधी होणार? डिजिटल युगाच साहित्य, नव्या युगातलं मराठी साहित्याचं रुप कुठेच झळकत नसल्याचा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे.
बोधचिन्हावरून सोशल मीडियावर जोरदार टीका
तब्बल 72 वर्षानंतर 2,3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Marathi Sahitya Sammelan 2024) पार पडणार आहे. या साहित्य संमेलनाचे बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात आली. संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात प्राचार्य डॉ. मिलन भामरे यांनी साकारलेल्या बोधचिन्हाची (Logo) सर्वानुमते निवड करण्यात आली. या बोधचिन्हात मराठीचा म, लेखणीसह बहिणाबाई यांचे जाते, खानदेशी वाद्य संबळ, आदिवासी वाद्य तारपा, केळीची पाने व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिकासह अमळनेर येथील मंगळग्रह (Mangalgrah Mandir) व सखाराम महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रतिकृतीचा ही वापर करण्यात आला. हे बोधचिन्ह खान्देशातील सगळ्या प्रतिमा गोळा करून त्याची मांडणी केली असल्याचे दिसत आहे. मात्र याच बोधचिन्हावरून आता सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
खान्देश म्हटलं म्हणजे जळगाव, धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) या तीन जिल्ह्यांचा समावेश या तिन्ही जिल्ह्यांच्या साहित्य संस्कृतीचा इतिहास या बोधचिन्हातून दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्हा हा केळी पिकासाठी प्रसिद्ध असून त्यामुळे यात केळीच्या पानांचा समावेश करण्यात आला आहे. बहिणाबाईंनी साहित्य क्षेत्रात ठसा उमटवला आहे. त्यामुळे बहिणाबाईंनी (Bahinabai) जात्यावर दळता दळता समाजाचे वास्तव आपल्या कवितेतून मांडले. तसेच खानदेशातील कष्टकरी शेतकरी महिला आपल्या भावना जात्यावरील ओव्यातून व्यक्त करत असतात. या साऱ्यांचे प्रतीक म्हणून जाते बोधचिन्हावर साकारण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि वारसा याचा परिचय व्हावा, म्हणून संबळ आणि आदिवासी तारपा वाद्य देखील साकारण्यात आले आहे. अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी म्हणूनच गुरुजींच्या गीतातील प्रेरणा ऊर्जा आणि उत्साह निर्माण करणाऱ्या 'बलसागर भारत होवो' ही ओळ बोधचिन्हात रेखांकित करण्यात आली आहे.
संस्कृतीसोबत नवसाहित्याचा मेळ
बोधचिन्हात जळगावसह खानदेशातील संस्कृती दर्शवण्यात आली आहे. यात लेखणी, केळीची पाने, मराठीचा म, बहिणाबाईचे जाते, ग्रामीण भागाचे वाद्य संबळ आदिवासी वाद्य तारपा, सरस्वती सखाराम महाराज मंदिर मंगळग्रह मंदिराच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला आहे. चिन्ह खाली बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहू या ओळी आहेत. या यावरून सोशल मीडियावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. प्रत्येक वेळी साहित्य संमेलनाचा लोगो तोच तोच का करण्यात येतो. आता साहित्य बदलत चालले आहे. त्यानुसार लोगोही पारंपरिक पद्धत सोडून नव्या युगातल्या मराठी साहित्याचं रूपात झळकला पाहिजे. संस्कृतीसोबत नवसाहित्याची माध्यम हा मेळ कलात्मकरित्या घालता आला असता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाची बातमी :