Gulabrao Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवावी', गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज
आमची मतं घ्यायची, आमच्या मतांवर खासदार व्हायचं आणि आमच्यावरच टीका करायची. तुम्ही जळगाव ग्रामीणमधून निवडणुकीला उभे राहून दाखवा, असे ओपन चॅलेंज गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे.
![Gulabrao Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवावी', गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज Gulabrao Patil open challenge to Sanjay Raut should contest election from Jalgaon Maharashtra Politics Marathi News Gulabrao Patil on Sanjay Raut : 'संजय राऊतांनी जळगावातून निवडणूक लढवावी', गुलाबराव पाटलांचं ओपन चॅलेंज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/25/9dfb8ac0cb6d0d1f7514d4c3600ad2631714052499357923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gulabrao Patil on Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) जळगावमध्ये येऊन गेले. जळगावात आले की माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही. आमची मतं घ्यायची, आमच्या मतांवर खासदार व्हायचं आणि आमच्यावरच टीका करायची. तुम्ही जळगाव ग्रामीणमधून निवडणुकीला उभे राहून दाखवा, असे ओपन चॅलेंज गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) संजय राऊतांना दिले आहे.
आज रावेर लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) आणि जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्या प्रचारार्थ जळगावमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
माझ्यावर बोलल्याशिवाय राऊतांना आनंद मिळत नाही
गुलाबराव पाटील म्हणाले की, हा जिल्हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे. काल संजय राऊत जळगावमध्ये येऊन गेले. ते जळगावात आले की माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद मिळत नाही. हा खान्देश आहे. इथे येऊन ते काय बोलून गेले. ज्या पक्षाबरोबर आपण 25-30 वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाxxx म्हणतात. ही तुमची संस्कृती आहे.
तुम्ही जळगाव ग्रामीणमधून निवडणुकीला उभे राहून दाखवा
राऊत म्हणाले गुलाबराव पाटील आणि चार जण निघून गेले. त्यांना माहीत नाही चार लोकं काय काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची यांची लायकी नाही. मी संजय राऊतांना आज आव्हान करतोय की, विधान सभेची निवडणूक अजून सहा महिन्यांवर आहे. तुम्ही जळगाव ग्रामीण मधून निवडणुकीला उभे राहून दाखवा. तुम्हाला जर पाडलं नाही तर माझ्या बापाचे नाव लावणार नाही, असे खुले आव्हान गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे.
थोडी लाज वाटत असेल तर राजीनामा द्या
आमची मतं घ्यायची, आमच्या मतांवर खासदार व्हायचं आणि आमच्यावरच टीका करायची. थोडी लाज वाटत असेल तर राजीनामा द्या. भाषणाला उभे राहिले की बाळासाहेबांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांच्या नखाची पण बरोबरी तुम्ही करू शकत नाही, असे ते म्हणाले.
गरिबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी
पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदीजी कोण आहेत हे त्यांना माहीत नाही. गरिबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. मोदीजी ही अशी व्यक्ती आहे की, ज्यांनी देशाची ओळख जगाला दिली आहे.
आणखी वाचा
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)